ओटीटी कंटेंट आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगची वाढती क्रेझ यामुळे वापरकर्त्यांमधील डेटाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता वापरकर्त्यांना ते प्लॅन अधिक आवडतात, ज्यामध्ये कमी किमतीत भरपूर डेटा दिला जातो. तुम्हीही तुमच्यासाठी अशीच योजना शोधत असाल, तर तुम्हाला बीएसएनएल, जिओ आणि एअरटेलच्या काही सर्वोत्तम आणि स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन आहेत. ज्यात तुम्ही ३२९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह, या प्लॅनमध्ये ३,३०० जिबी पर्यंत डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह अनेक उत्तम फायदे मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात….

जिओचा सर्वोत्तम प्लान

जिओच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये तुम्हाला ९९९ रुपयांमध्ये १५०Mbps स्पीडवर ३,३०० जिबी म्हणजेच ३.३ TB इंटरनेट दिले जात आहे. यामध्ये तुम्हाला १५० Mbps च्या सममितीय अपलोड आणि डाउनलोड स्पीड दिला जाईल. दरम्यान हा प्लान Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Eros Now सारख्या १५ OTT प्लॅटफॉर्मच्या वार्षिक सबस्क्रिप्शनसह येईल. या प्लानच्या डेटाची वैधता ३० दिवसांची आहे.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

एअरटेल ब्रॉडबँड योजना

एअरटेलचा ब्रॉडबँड प्लान २००Mbps इंटरनेट स्पीडवर ३,३००जिबी म्हणजेच ३.३ TB हाय स्पीड डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ‘एअरटेल थँक्स’, विंक म्युझिकमध्ये प्रवेश आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टारसह इतर अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनचे फायदे दिले जात आहेत. या प्लॅनची ​​किंमत देखील ९९९ रुपये आहे आणि त्याची वैधता देखील ३० दिवसांची आहे.

बीएसएनएल ब्रॉडबँड योजना

बीएसएनएलच्या या प्लानची किंमत ७४९ रुपये प्रति महिना आहे. या प्लानमध्ये तुम्हाला १००Mbps च्या स्पीडने १००० जिबी डेटा दिला जात आहे. एवढा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ५Mbps इतका कमी होतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Sony Live Premium आणि G5 Premium सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता देखील दिली जाईल.