scorecardresearch

Jio Airtel 5G Launch: जाणून घ्या 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील

जाणून घ्या जिओ आणि एअरटेल 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील

Jio Airtel 5G Launch
जाणून घ्या 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील( फोटो: financial express)

जिओ आणि Airtel ने त्यांच्या ५जी सेवेबाबत तयारी सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या स्पेक्ट्रम लिलावादरम्यान, त्यांनी ५जी स्पेक्ट्रमसाठी जोरदार बोली लावली, ज्यामुळे देशातील सर्व ५जी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. यासोबतच, दोन्ही कंपन्यांनी या महिन्यापासून ५जी सेवा सुरू करणार अशी घोषणाही केली आहे. अशा परिस्थितीत जिओ आणि एअरटेलची ५जी सेवा कशी चालेल, हा प्रश्न सध्या वापरकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जाणून घ्या लाँचची तारीख, स्पीड, योजना आणि इतर तपशील.

Jio 5G सेवा

Jio 5G सेवा कधी सुरू होणार?

अलीकडेच, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की जिओ भारतात आपली ५जी सेवा सुरू करून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करेल. अशा परिस्थितीत, असं मानण्यात येत आहे की, कंपनी दोन ते तीन दिवसात आपली ५जी सेवा सुरू करू शकते किंवा ती या महिन्यात लाँच केली जाऊ शकते. कंपनी याची मेट्रो शहरांपासून सुरू करणार आहे, नंतर ती देशभरात आणली जाईल.

( हे ही वाचा: 4G सिमवर 5G सेवा उपलब्ध असेल का? की नवीन सिमची आवश्यकता असेल? जाणून घ्या सविस्तर)

काय असेल Jio 5G रिचार्ज प्लॅन?

स्पेक्ट्रम लिलावादरम्यान, रिलायन्स जिओने सर्वाधिक पैसा खर्च केला आहे. यासाठी कंपनीने ८८,०७८ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे सुरुवातीला ५जी सेवा महाग होणार अशी शंका आहे. कदाचित ५जी सेवा ४जी पेक्षा २ पट जास्त महाग असेल.

तुम्हाला Jio 5G सिम कधी मिळेल?

कंपनी आपली ५जी सेवा काही शहरांमधून सुरू करणार आहे. पण या महिन्यापासून जिओचे ५जी सिम देशभरात मिळणे सुरू होईल अशी अपेक्षा आहे. जिओ स्टोअर व्यतिरिक्त, हे सिम ओरिटेलथ जिओ स्टोअरवर देखील उपलब्ध असेल असं समजण्यात येत आहे.

Jio 5G चा स्पीड किती असेल?

५जी चाचणी दरम्यान, कंपनीने १ Gbps पर्यंत डेटा स्पीडला पोहोचला होता. मात्र, अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार एक स्क्रीन शॉट लीक केला होता ज्यामध्ये कंपनी ४०० Mbps च्या स्पीडला स्पर्श करत होती. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की सुरुवातीला ५जी अंतर्गत वापरकर्त्यांना इतका वेग मिळणार आहे. हा स्पीड 4G पेक्षा नक्कीच जास्त असेल.

( हे ही वाचा: 5G सेवा सुरू होण्यापूर्वी 4G प्लॅनच्या दरात ​​30% वाढ; ‘या’ ग्राहकांना बसणार फटका)

कोणत्या बँडला Jio 5G सेवा मिळेल?

५जी स्पेक्ट्रम लिलावादरम्यान, सरकारने एकूण ७२०९७.८५MHz स्पेक्ट्रम बँड लिलावासाठी ठेवले होते आणि या लिलावात कंपनीने ७००MHz, ८००MHz, १८००MHz, ३३०९MHz मिड फ्रिक्वेन्सी बँड आणि २६GHz हाय-फ्रिक्वेंसी बँड मिळवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने संपूर्ण २२ सर्कलसाठी ७००MHz बँड मिळवला आहे. म्हणजेच कंपनीची ५जी सेवा या स्पेक्ट्रम बँडवर सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Airtel 5G सेवा

Airtel 5G सेवा कधी सुरू होईल?

एअरटेलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की कंपनी लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जिओला टक्कर देण्यासाठी कंपनी या महिन्यात आपली ५जी सेवा लाँच करू शकते अशी माहिती मिळत आहे.

( हे ही वाचा: खुशखबर! ‘या’ दिवसापासून तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 5G सेवा मिळेल; स्पीड 4G पेक्षा 10 पट असेल जास्त)

airtel 5g रिचार्ज योजना

कंपनीने आधीच सांगितले आहे की ५जी सेवा आता महाग होतील आणि ARPU वाढणार आहे. त्याच वेळी, यावेळच्या ५जी स्पेक्ट्रम लिलावात कंपनीने ४३,०८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा परिस्थितीत, ५जी सेवेबद्दल हे स्पष्ट आहे की तुम्हाला ५जी सेवा अनुभवण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल.

तुम्हाला Airtel 5G सिम कधी मिळेल

Jio प्रमाणे, Airtel आपली ५जी सेवा एकाच वेळी देशभरात सुरू करणार नाही, तर कंपनी काही शहरांतून ती सुरू करणार आहे परंतु ५जी सिम लवकरच देशभरात उपलब्ध होईल.

( हे ही वाचा: 5G सिम कसे असेल आणि तुमचा मोबाईल नंबर 5G मध्ये कसा बदलला जाईल? संपूर्ण माहिती जाणून घ्या)

Airtel 5G चा स्पीड किती असेल?

एअरटेलने दावा केला आहे की कंपनी ४जी पेक्षा चांगला अनुभव ५जी सेवेमध्ये देणार आहे. चाचणी दरम्यान कंपनीला १ Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळवण्यात यश आले असले तरी यूजर्सना जास्तीत जास्त ४०० आणि ५०० Mbps पर्यंत स्पीड मिळणार आहे.

एअरटेल 5G सेवा कोणत्या बँडवर उपलब्ध असेल?

एअरटेलने १८००, २१०० आणि २३००MHz बँडसह ३.५GPS बँडसह २६ GHz स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक केली आहे. या बँडचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्याकडे कमी खर्चात १०० पट चांगले कव्हरेज देण्याची क्षमता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-08-2022 at 14:23 IST