choose your own Jio number : स्मार्टफोन घेतला की, सगळ्यात पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे मोबाईल नंबर कोणत्या कंपनीचा निवडायचा? पण, अनेकदा आपला मोबाईल नंबर स्वतःला निवडता यावा, अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण, सहसा असं क्वचितच शक्य होतं. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- जिओ Jio ने ग्राहकांसाठी नवीन योजना सादर केली आहे. या योजनेचं नाव आहे चॉईस नंबर योजना (Choice Number scheme); जी वापरकर्त्यांना त्यांचे फोन नंबर स्वतः निवडण्याची परवानगी देत आहे.

वाढदिवस किंवा लग्नाची तारीख किंवा लकी नंबर जोडून तुम्हाला एखादा मोबाईल नंबर कस्टमाइज्ड करायचा असेल, तर तुम्ही या योजनेचा उपयोग करू शकता. जिओ चॉईस नंबर योजनेंतर्गत, वापरकर्ते ४९९ रुपये भरून त्यांच्या मोबाईल नंबरमधील शेवटचे चार ते सहा अंक आपल्या मनाप्रमाणे निवडू शकतात. जर तुम्ही दिलेला नंबर तिथे उपलब्ध नसेल, तर Jio तुम्हाला पिन कोडद्वारे पर्याय सुचवेल. ही सुविधा केवळ JioPlus पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे आणि ग्राहकांना या योजनेचा लाभ घेताना नवीन सिम कार्डसुद्धा मिळेल.

Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
amaltash movie
सरले सारे तरीही…
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

तुमचा फोन नंबर कसा कस्टमाइज्ड कराल ?

वापरकर्ते MyJio ॲप/वेबसाइटद्वारे किंवा जिओ चॉईस नंबर वेबसाइटवर नेव्हिगेट करून, या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही पद्धतींद्वारे तुमचे नवीन सिम कार्ड कसे ऑर्डर करावे याबद्दलच्या स्टेप्स खालीलप्रमाणे :

१) जिओच्या https://www.jio.com/selfcare/choice-number चॉइस नंबर वेबसाइटवर जा.

२) त्यानंतर तुम्हाला तुमचा सध्याचा JioPostpaid Plus नंबर OTP द्वारे verify करण्यास सांगितले जाईल.

३) पडताळणीनंतर तुम्हाला समोर एक नवीन पेज दिसेल. त्यात तुम्हाला मोबाईल नंबरमधील चार ते सहा अंक, नाव, पिनकोड टाकण्यासाठी पर्याय समोर येईल.

४) आता तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या पिनकोडमध्ये उपलब्ध असलेले फोन नंबर दिसतील.

५) त्यानंतर तुमच्या आवडीचा नंबर निवडा आणि नवीन सिम कार्ड मिळविण्यासाठी पेमेंट करा.

हेही वाचा…जिओ, एअरटेलचं सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचंय? फक्त ‘या’ तीन स्टेप्स करा फॉलो; काहीच दिवसांत होईल मोबाईल नंबर पोर्ट

जिओ ॲपद्वारे नंबर मिळविण्याच्या स्टेप्स :

१) तुमच्या फोनवर MyJio ॲप उघडा आणि मेन्यू सेक्शनमध्ये जा.

२) निवडलेल्या नंबरवर क्लिक करा आणि ‘Let’s book now’ हा पर्याय निवडा.

३) नवीन नंबरसाठी तुमचे नाव, पिन कोड आणि पसंतीचे ४-५ अंक जोडा आणि ’Show available numbers’वर क्लिक करा.

४) तुम्हाला आवडेल तो नंबर निवडा आणि ‘let’s book now’वर क्लिक करा. तुमचा नवीन नंबर मिळविण्यासाठी ४९९ रुपये भरा.

तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा नंबर स्वतः निवडू शकता.

Story img Loader