वनडे विश्वचषक २०२३ अंतिम टप्प्यावर येऊन पोहचली आहे. उद्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. तसेच ही मॅच पाहण्यासाठी चाहते अगदीच उत्सुक आहेत. तारीख निश्चित आहे आणि यात विकेंडसुद्धा आहे; त्यामुळे मॅच पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. ऑनलाइन मॅच पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राच्या हॉटस्टार सबस्क्रिप्शनवर अबलंबून असाल किंवा सबस्क्रिप्शन विकत घेऊन मॅच पाहण्याची योजना आखत असाल तर खालील काही ऑफर्स खास तुमच्यासाठी आहेत. तसेच तुम्ही जर जिओ वापरकर्ते असाल तर तुम्ही या ऑफर्स मोफत मिळवू शकता.

रिलायन्स जिओ निवडक प्रीपेड प्लॅनवर डिस्नी प्लस हॉटस्टार आणि इतर स्ट्रीमिंग ॲपचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. वापरकर्ते फायजी स्पीड (5G), अमर्यादित कॉलिंग आणि स्ट्रीमिंग सेवांच्या सबस्क्रिप्शनसाठी अतिरिक्त पैसे न देता याचा आनंद लुटू शकणार आहेत. तर जिओ (Jio) प्रीपेड मोबाइल प्लॅन्ससह मोफत मिळणाऱ्या डिस्नी प्लस हॉटस्टारच्या ऑफर्सवर (Disney+ Hotstar) नजर टाकूयात.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

मोफत डिस्नी प्लस हॉटस्टारसह (Disney+ Hotstar) जिओ (Jio) प्रीपेड मोबाइल प्लॅन्स पाहूयात :

१. जिओचा ३२८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Rs 328 Prepaid plan) :

३२८ रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना २८ दिवसांच्या कालावधीसाठी १.५ जीबी (1.5 GB ) डेटा ऑफर करते. या व्यतिरिक्त प्लॅनच्या सदस्यांना डिस्नी प्लस हॉटस्टारचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे, ज्यामुळे ते क्रिकेट विश्वचषक मॅचचा पुरेपूर आनंद लुटू शकणार आहेत.

२. जिओचा ३८८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Rs 388 Prepaid plan) :
दिवसाला जास्त डेटाचा उपयोग करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन उत्तम ठरेल. जिओचा ३८८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांसाठी दिवसाला २ जीबी (2 GB) डेटा पुरवतो. तसेच अतिरिक्त बोनस म्हणून सदस्यांना डिस्नी + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

हेही वाचा…आता इन्स्टाग्रामवर ‘क्लोज फ्रेंड्स’ लिस्टसह ‘या’ गोष्टीसुद्धा होणार शेअर… पाहा काय होणार बदल

३. जिओचा ७५८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Rs 758 Prepaid plan) :

जिओचा ७५८ रुपयांचा प्रीपेड प्लॅनचा कालावधी ८४ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच हा प्लॅन दिवसाला १.५ जीबी (1.5 GB) डेटा वापरकर्त्यांना पुरवते. तसेच या प्लॅनच्या सदस्यांना यात तीन महिन्यांचा डिस्नी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

४.जिओचा ८०८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Rs 808 Prepaid plan) :

जिओचा हा प्रीपेड प्लॅन ८४ दिवसांच्या कालावधीत दिवसाला २ जीबी (2 GB ) डेटा ऑफर करतो. तसेच या प्लॅनचा उपयोग करणाऱ्या वापरकर्त्यांना डिस्नी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

५. जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Rs 598 Prepaid plan) :

जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी (2 GB ) डेटा प्रदान करतो. तसेच या प्लॅन बरोबर तुम्हाला खास ऑफर आहे. कारण, या बरोबर तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टारचे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

६. जिओचा ३,१७८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Rs 3,178 Prepaid plan) :

जिओच्या ३,१७८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा कालावधी एक वर्षाचा आहे. तसेच हा दिवसाला २ जीबी (2 GB ) डेटा पुरवतो. या बरोबर खास ऑफरमध्ये ग्राहकांना डिस्नी प्लस हॉटस्टारचे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शनचा फायदा होईल. ज्यामुळे डेटा आणि ऑफरमुळे वापरकर्ते मॅच बघण्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार आहेत.