Jio outage : देशातील सर्वाधिक लोकप्रिय दूरसंचार कंपनी जिओची सेवा आज जवळपास तीन तासांपर्यंत ठप्प झाली होती. यामुळे अनेक जिओ युजर्सना कॉल करणे, रिसिव्ह करणे अशक्य झाले. एसएमएस सेवादेखील वापरता आली नाही. ही समस्या आज सकाळी सुरू झाली. सकाळी ६ वाजतापासून ते ९ वाजेपर्यंत युजर्सनी याबाबत तक्रार व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वीही सेवा विस्कळीत झाली होती, मात्र त्या तुलनेत यंदा केवळ कॉलिंग आणि एसएमएस सेवा ठप्प झाली. बहुतांश जिओ वापरकर्त्यांसाठी इंटरनेट सेवा सुरू होती. सेवा ठप्प होताच अनेक युजर्सनी याबाबत ट्विटरवर तक्रार केली.

(फेसबुक व्हेरिफाइड बॅज हवा आहे? मग ‘या’ बाबींची पूर्तता करणे गरजेचे, जाणून घ्या प्रक्रिया)

एका ट्विटर युजरने ट्विटरवर याबाबत पोस्ट केली. सकाळपासून कॉल लागत नाहीये. सामान्य कॉल लावताना समस्या येत आहेत. असे असताना तुम्ही ५ जी सेवा देण्याचा विचार करत आहात? असा प्रश्न @Pratikmalviya36 या ट्विटर युजरने उपस्थित केला. तर दुसऱ्या युजरने, जिओची सेवा ठप्प झाल्याने टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करताना अडचण येत असल्याचे नमूद केले.

आऊटेज डिटेक्शन वेबसाईट डाऊन डिटेक्टरने देखील जिओची सेवा ठप्प झाल्याने शेकडो वापरकर्ते प्रभावित झाल्याचे दाखवले असून मुंबई, दिल्ली, कोलकातासह सर्व मोठ्या शहरांमधून या समस्येबाबत अहवाल येत आहेत. सेवा ठप्प झाल्याबाबत जिओने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ही समस्या कशामुळे उद्भवली याचे कारण अद्याप समजले नाही. याअगोदर ऑक्टोबर, जून आणि फेब्रुवारी महिन्यात युजर्सना अशी समस्या जाणवली होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio outage jio calling and sms service disrupted for nearly three hours ssb
First published on: 29-11-2022 at 10:02 IST