जिओचा सर्वात आकर्षक प्लॅन! १०० जिबी डेटा आणि मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि बरेच काही

जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला १०० जिबी डेटा दिला जातो.

१०० जिबी डेटा आणि Netflix, Disney+ Hotstar आणि बरेच काही मोफत (photo: file photo)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडे विविध किमतींवर अधिक लाभांसह अनेक धमाकेदार प्लॅन्स आहेत. किंमती वाढल्यानंतरही एक योजना खूप लोकप्रिय आहे आणि सर्वांना ती आवडते. कारण ते कमी किमतीत OTT फायदे देते. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Disney Plus Hotstar आणि Amazon Prime मोफत मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर…

जिओचा ५९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅन

जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला १०० जिबी डेटा दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर १० रुपये प्रति जीबी शुल्क आकारले जाते. प्लॅनची ​​सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यूजर्सना २०० जिबी पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते.

अमर्यादित कॉलिंग

या प्लॅनमध्ये डेटासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस ऑफर केले जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये अतिरिक्त सिम कार्ड देखील दिले जाते.

मोफत Netflix, Disney+ Hotstar आणि बरेच काही

Jio च्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये, Netflix व्यतिरिक्त, वापरकर्त्याला Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे सदस्यत्व १ वर्षासाठी मोफत मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचा मोफत प्रवेशही दिला जातोय. या प्‍लॅनचा रिचार्ज करण्‍याच्‍या युजर्सकडे ९९ रुपयांचे जिओ प्राईम असले पाहिजे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jio postpaid plan offers 100gb data free netflix disney plus hotstar and much more check benefits scsm

Next Story
Amazon Great Republic Day Sale 2022: मॅकबुक प्रो, एअरपॉड्स आणि अनेक प्रोडक्ट्सवर उत्तम डील्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी