Dell Layoff: सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कंपन्यांमध्ये कमर्चाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. याचा भारतातील कंपन्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, Dell Technology मधील कमर्चाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे. डेल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कमर्चाऱ्यांची नोकर कपात करणार आहे. म्हणजेच डेल कंपनी ६,६५० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

२०२३ मध्ये कर्मचाऱ्यांची कपात करणारी डेल ही प्रमुख लॅपटॉप कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे. ब्लूमर्गच्या अहवालानुसार कंपनीचे को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनी ही बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करू शकते.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Dell Technologies – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

हेही वाचा : Layoffs In 2023: Apple पासून Microsoft पर्यंत ‘या’ कंपन्यांनी केली कर्मचाऱ्यांची कपात, पाहा संपूर्ण यादी

को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या नोटमध्ये ते म्हणतात कि, आम्ही या आधीही आर्थिक मंदीचा सामना केला आहे त्यामुळे आम्ही अधिक मजबूत झालो आहोत. २०२०मध्ये करोना महामारीच्या काळात देखील आम्ही टाळेबंदीची घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात एचपीने जाहीर केले होते की , पर्सनल कॉम्प्युटर्सची मागणी कमी होत आहे . ज्यामुळे पुढील तीन वर्षात ६,००० लोकांना कामावरून कमी केले जाऊ शकते.

उद्योग विश्लेषक IDC ने सांगितले की, २०२२ च्या चौथ्या तिमाहीमधील प्रारंभीचे आकड्यानुसार पर्सनल कॉम्युटपरच्या मागणीत तीव्र घट होत आहे. IDC च्या मतानुसार सर्व प्रमुख कंपन्यांमध्ये डेलने या कालावधीच्या तुलनेत २०२१ मध्ये ३७ टक्क्यांनी घसरण झालेली पहिली. डेल कंपनीच्या कमाईमध्ये ५५ टक्के कामे ही पीसी मधून करते.