देशात ५ सेवेचा शुभारंभ झालेला आहे. ५ जी सेवा ४ जी पेक्षा १० पट वेगाने इटरनेट सेवा देईल, असे सांगितल्या जाते. ही सेवा गेमिंग, ऑनलाईन व्हिडिओ आणि इतर कार्यात फायदेशीर ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आता फोन घेताना ग्राहक ५ जी फोनला पसंती देत आहेत. दरम्यान ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लावाने आपला ५ जी फोन भारतात लाँच केला आहे. फोनची किंमत सुमारे १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

भारतीय कंपनी लावा इंटरनॅशनलने सोमवारी आपला पहिला ५ जी स्मार्टफोन देशात लाँच केला. या फोनची किंमत १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. फोनची प्री बुकिंग दिवाळीच्या आसपास सुरू होणार आहे. किफायतशीर किंमतीमध्ये ग्राहकांना ५ जी स्मार्टफोन देण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी हे उत्पादन जुळलेले आहे, असे लावा इंटरनॅशनल कंपनीचे आध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील रैना यांनी एका निवेदनात सांगितले.

follow these steps to delete your account and Remove number from the Truecaller app On Android And iOS
Truecaller वरून तुमचे अकाउंट अन् नंबर कसं Deactivate कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Honor Pad 9 launched in India soon With eight speakers Big battery Pack and free Bluetooth keyboard
कमिंग सून! 8,300mAh बॅटरी अन् मोफत ब्लूटूथ कीबोर्डसह ‘हा’ अँड्रॉइड टॅब होणार लाँच, पाहा जबरदस्त फीचर्स
Samsung announced Mega Offers With Holi Sale 2024 sixty percent off on smartphones tablets and laptops
सॅमसंगच्या Holi Sale ची घोषणा; स्मार्ट टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन अन् ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार बंपर डिस्काउंट
ASUS India announces the launch of AI Features Zenbook S 13 OLED and Vivobook 15 models in India
32GB रॅम, OLED डिस्प्लेसह ‘या’ कंपनीचे सुपरस्लीम लॅपटॉप लाँच; पाहा एआय फीचर्स अन् किंमत

(Google translate : गुगलने चीनमध्ये बंद केले ‘गुगल ट्रान्सलेट’, ‘हे’ आहे कारण)

फोनचे फीचर

Lava Blaze 5G फोनला मागे ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच चांगली सेल्फी काढण्यासाठी फोनच्या पुढील भागात ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गतिमान कार्यासाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चिपसेट देण्यात आले आहे. तर फोनमध्ये ४ जीबी रॅमसह ३ जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे.

फोनमध्ये १२८ जीबीची इंटरनेल स्टोरेज मिळत आहे. दीर्घकाळ काम करता यावे यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये साईड माउन्टेड वेगवान फिंगर प्रिंट अनलॉक फिचर देखिल देण्यात आले आहे.

(१०८ एमपी कॅमेरा आणि गतिमान प्रोसेसरसह लाँच झाला Moto G 72, पण ‘हा’ महत्वाचा फीचर नाही)

नवीन तंत्रज्ञान सर्वांना वापरता यावे यासाठी हा या ५ जी फोनचा हेतू आहे, असे मीडियाटेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अंकू जैन म्हणाले. दरम्यान लावाच नव्हे तर आता अनेक कंपन्या बाजारामध्ये परवडणाऱ्या किंमतीत ५ जी फोन्स लाँच करत आहेत. या फोन्समध्ये अनेक फीचर आहेत. यांना भारतातच बनवलेला हा लावा फोन जोरदार आव्हान देईल का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.