LAVA BLAZE NXT LAUNCH : लावाने नवीन Lava Blaze Nxt स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा बजेट श्रेणीतील फोन असून त्याची किंमत ९ हजार २९९ रुपये आहे. २ डिसेंबरपासून हा स्मार्टफोन अमेझॉन आणि लावा ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. हा फोन ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधूनही खरेदी करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स

फोनमध्ये अडथळ्याशिवाय काम होण्यासाठी २.३ गिगाहर्ट्झ क्लॉक स्पिडसह मीडियाटेक हेलिओ जी ३७ प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आली असून, फोनची रॅम ३ जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये सर्वात वर वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आले आहे ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये १६००x७२० पिक्सेल रेझोल्युशनसह ६.५ इंच एचडी + आयपीएस स्क्रिन देण्यात आली आहे.

(अबब! ५०० दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा विक्रीला काढला, हॅकरने इतकी लावली किंमत, ‘या’ देशांतील युजर्सचा समावेश)

ट्रिपल कॅमेरा सेटअप

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यामध्ये १३ एमपी एआय मेन कॅमेरा, २ एमपी कॅमेरा व्हीजीए आणि एलइडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या पुढील भागात सेल्फी काढण्यासाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये डॉक्युमेंट इंटेलिजेंट स्कॅनिंग, स्लो मोशन व्हिडिओ, जीआयएफ आणि टाईम लॅप्स फोटोग्राफी हे कॅमेरा फीचर देण्यात आले आहेत.

३२ तासांची बॅटरी लाईफ

फोनमध्ये दीर्घकाळ कार्य करण्यासाठी ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली असून तिच्यातून ३२ तासांची बॅटरी लाईफ मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. फोनमध्ये वायफाय, यूएसबी टाइप सी, ब्ल्युटूथ व्ही ५.०, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि ४ जी कनेक्टिव्हिटी मिळत आहे. फोन ग्रीन ग्लास, ग्लास ब्ल्यू आणि ग्लास रेड या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lava blaze nxt launch in india check features and price ssb
First published on: 27-11-2022 at 17:27 IST