scorecardresearch

Premium

Lava ने भारतात लॉन्च केला ‘हा’ स्वस्त फोन; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…

Lava कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Lava Blaze Pro 5G launch india with 50 mp camera
Lava च्या या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना फुल एचडी + डिस्प्ले मिळणार आहे. (Image Credit-@LavaMobile/X)

lava ही एक भारतीय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स कंपनी बाजारामध्ये लॉन्च करत असते. त्यामध्ये कंपनी नवनवीन फीचरटस आणि अपडेट्स देत असते. कंपनीने नुकताच आपला Lava Blaze Pro 5G हा फोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने दोन रंगामध्ये सादर केला आहे. तसेच यामध्ह्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये मिडियाटेक डायमेन्शन ६०२० SoC चा सपोर्ट मिळतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. lava कंपनीच्या या नवीन स्मार्टफोन्सची किंमत, फीचर्स आणि कॅमेऱ्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Lava Blaze Pro 5G: फीचर्स

Lava ब्लेझ प्रो ५ जी हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर चालतो. यामध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. या डिस्पेलचा रिफ्रेश रेट हा १२० Hz एक आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. यामध्ये मिडियाटेक डायमेन्शन ६०२० SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…
realme c53 launch
Realme ने नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला ‘हा’ स्मार्टफोन; १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि.., जाणून घ्या
NavIC isro system use in iphone pro and pro max model
आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…
honor 90 5g launch with 200 mp camera
फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च

हेही वाचा : १४ हजारांत घरी आणा फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, ‘या’ ठिकाणी खरेदी करता येणार

Lava Blaze Pro 5G स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम मिळते. यामधील स्टोरेज हे १६ जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा युनिट देण्यात आले आहे. रिअर कॅमेरा सेटअपमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. हे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ५जी, ४जी, ब्लूटूथ ५.० , FM रेडिओ, OTG , वाय-फाय , ३.५ मामीचे ऑडिओ जॅक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचे फीचर्स मिळतात. या मोबाइलमध्ये कंपनीने फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात फेस अनलॉकची सुविधा देखील देण्यात आली आहे. lava बेलज प्रो ५जी मध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात ३३ W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो. अन्य lava स्मार्टफोनप्रमाणेच नवीन फोनमध्ये ‘फ्री सर्व्हिस अ‍ॅट होम’ प्रोग्रॅम मिळणार आहे. जे देशातील विविध ठिकाणी डोरस्टेप सेवा ऑफर करेल.

हेही वाचा : VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…

Lava Blaze Pro 5G : भारतातील किमंत आणि उपलब्धता

Lava Blaze Pro 5G हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये असणार आहे. खरेदीदार हा फोन Radiant Pearl आणि Starry Night या दोन रुग्णामध्ये खरेदी करू शकणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून हा फोन कंपनीची अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lava blaze pro 5g smartphone luanch india 3 october amazon sale 2023 50 mp camera check details tmb 01

First published on: 27-09-2023 at 13:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×