देशांतर्गत स्मार्टफोन निर्माता लावा कंपनीने सोमवारी आपली घरोघरी सेवा ‘सर्व्हिस अॅट होम’ लाँच केली. कंपनीने देशभरातील ९००० पिनकोडवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना कंपनीच्या आगामी सर्व स्मार्टफोन्ससाठी घरपोच सेवेचा लाभ मिळणार आहे. लावाने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. कंपनीचे म्हणणे आहे की, सर्व्हिस रिक्वेस्ट प्राप्त झाल्यानंतर दोन तासांच्या आत प्रतिसाद दिला जाईल आणि ४८ तासांच्या आत समस्या सोडवली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही सेवा लावाच्या अधिकृत वेबसाइट, कॉल सेंटर, लावा केअर अॅप आणि अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवरून घेतली जाऊ शकते. पण त्याचा फायदा फोनच्या वॉरंटी कालावधीपर्यंतच मिळेल. फोनच्या बॉक्सवर छापलेला QR कोड स्कॅन करूनही सर्व्हिस रिक्वेस्ट नोंदवता येईल.

आणखी वाचा : Reliance Jio: ३०० रूपयांपेक्षा कमी किमतीचे ११ रिचार्ज प्लॅन; अनलिमिटेड कॉल आणि डेटा…

Lava Offering Free Pick-up And Delivery
फोनमधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी संबंधित किरकोळ समस्या घरबसल्या दूर केल्या जातील, असे कंपनीचे म्हणणे आहे. दुसरीकडे फोनमध्ये कोणतीही मोठी समस्या असल्यास, फोन जमा करून सेवा केंद्रात नेले जाईल. दुरुस्तीनंतर तो ग्राहकांच्या घरी परत दिला जाईल. मोफत पिक-अप आणि डिलीव्हरी व्यतिरिक्त लावा आपल्या ग्राहकांना येणाऱ्या सर्व फोनवर मोफत स्क्रीन बदलण्याची सेवा देखील देत आहे.

आणखी वाचा : रंग बदलणारा नवा स्मार्टफोन Tecno Camon 19 Pro Mondrian Edition

लावा इंटरनॅशनल लिमिटेडच्या ग्राहक सेवा प्रमुख सत्या सती म्हणाले, “ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी घरपोच सेवा हा एकच उपाय आहे. आम्ही आमच्या आगामी सर्व स्मार्टफोनसाठी ही सेवा देत आहोत. याचे कारण म्हणजे ग्राहकांचा अनुभव सुधारणे आणि सेवा केंद्रांवरील लांबलचक रांगा टाळणे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी कंपनीने अधिकृत सेवा भागीदारांशीही भागीदारी केली असल्याची माहिती लावा यांनी दिली आहे. माहितीनुसार, देशभरात लावा ५० ऑन व्हील सेवेची ७०५ सेवा केंद्रे आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lava doorstep smartphone service home at services launched across 9000 pincodes in country prp
First published on: 05-09-2022 at 21:58 IST