HP layoff Plan: कोरोना काळात जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केल्यानं रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. असाच प्रकार आता जगातील प्रसिद्ध टेक कंपनी Hewlett-Packard म्हणजेच (HP Company) मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळात ही कंपनी सहा हजार नोकऱ्यांची कपात करण्याच्या विचारात आहे. कारण, दिवसेंदिवस पर्सनल कंप्यूटरच्या मागणीत होणारी घट आणि महसूलातील घसरण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, Hewlett-Packard Company पुढील तीन वर्षात ६००० नोकऱ्यांपर्यंत पोहचेल. आणखी वाचा - संगणक, लॅपटॉपची गती कमी झाली? डिलीट करा ‘हा’ डेटा, कार्यक्षमता वाढण्यास होईल मदत कपंनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एनरिक लोरेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचपी त्यांच्या रियल इस्टेट फूटप्रिंटला कमी करेल आणि पुढील तीन वर्षात त्यांच्या ६१,००० ग्लोबल कर्मचाऱ्यांमध्ये दहा टक्के कपात करणार आहे. कंपनीसाठी रिस्टक्चरिंग कॉस्ट एकूण १ बिलियन डॉलर होण्याची आशा आहे. यामध्ये जवळपास ६० टक्के कॉस्ट नवीन आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कमी व्हायला सुरुवात झाली. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत वार्षिक १.४ बिलियन डॉलरची बचत करण्याची योजना आहे. आणखी वाचा - Elon Musk: ट्विटर संपणार म्हणणाऱ्यांना एलॉन मस्क यांचा उलट सवाल; म्हणाले, “ट्विटरने आत्तापर्यंत…” ग्लोबल पीसी शिपमेंटमध्ये जवळपास २० टक्के घसरण लोरेस यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आताच्या आर्थिक वर्षात कंप्यूटरच्या विक्रीत १० टक्के घसरण पाहायला मिळू शकते. तिसऱ्या तिमाहीत ग्लोबल पीसी शिपमेंट मध्ये जवळपास २० टक्के घसरण पाहायला मिळाली. डेल टेक्नोलॉजीज इंक, त्यांच्या महसूलातील ५५ टक्के पीसीच्या विक्रीतून उत्पन्न मिळवतात. या कंपनीने केली कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा नुकतंच काही आयटी कंपन्यांनी कर्माचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची घोषणा केलीय. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि amazon.com इंकने जवळपास १०००० कर्माचाऱ्यांची कपात सुरु केली. तसंच ट्विटर इंकने त्यांच्या ७५०० कर्मचाऱ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक जणांना कामावरून काढून टाकलं. तर सिस्को सिस्टम इंकने मागच्या आठवड्यात नोकरी आणि कार्यालय कमी करण्याची घोषणा केली. हाय ड्राईव्ह निर्माता सिगेट टेक्नोलॉजी होल्डिंग्स पीएलसीनेही जवळपास तीन हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे.