Lenovo या कंपनीने आपला Tab P11 5G हा पहिला प्रीमियम टॅबलेट १३ जानेवारी रोजी लाँच केला आहे. हा टॅबलेट ५जी कनेक्टिव्हिटीमध्ये येतो. या टॅब्लेटमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज येते. याचा प्रोसेसर Qualcomm स्नॅपड्रॅगन ७५०जी ५जी चा आहे. यामध्ये २के टचस्क्रीन आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळतो. आपण टॅबलेटच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Lenovo Tab P11 5G चे फीचर्स

या टॅबमध्ये ११ इंचाचा आयपीएस एलसीडी स्क्रीन येतो. यामध्ये जेबीएलचे चार स्पीकर येतात. यामध्ये ८जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरीज येते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने इंटर्नल स्टोरेज ५१२ जीबीने वाढवता येते. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G 5G चा मोबाईल प्रोसेसर येतो. या टॅबलेटचा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो. याच्या बॅटरीची क्षमता ७,७०० mAh आहे. १० वॅटचा चार्जिंग सपोर्ट येतो. एकदा १०० टक्के चार्ज केल्यावर हा टॅब १२ तास चालता येतो असे कंपनीचा दावा आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: ‘या’ उपकरणांवर मिळतेय ‘इतकी’ सूट; जाणून घ्या

जाणून घ्या किती आहे किंमत ?

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या टॅबची किंमत २९,९९९ रुपये आहे. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत ही ३४,९९९ रुपये आहे. हा टॅबलेट lenovo च्या ऑनलाईन स्टोअरवर आणि Amazon India वर उपलब्ध आहे. यामध्ये स्टॉर्म ग्रे ,मून व्हाईट , मॉडर्निस्ट टेल या रांगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी यावर एक वर्षाची कॅरी इन वॉरंटी देत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lenovo company launched lenovo tab p11 5g a premium tablet with attractive features tmb 01
First published on: 17-01-2023 at 11:38 IST