एअरटेलने काही मोजक्या शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. चांगली सेवा पुरवण्यासाठी एअरटेल प्रयत्नशील जरी असले तरी एअरटेल ५ जी प्लस सेवेशी अनेक स्मार्टफोन सुंसगत नसून त्यांना सॉफ्टवेअर अपडेटची गरज असल्याचे दिसून येत आहे. जे फोन्स एअरटेल ५ जी प्लसची सेवा देण्यासाठी तयार नाही, अशा फोन्सबाबत आज आपण जाणून घेऊया.

१) वन प्लस

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
Whatsapp New Feature Search Messages by Date Marathi News
WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!
Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास
Mohammed Shami's social media post after surgery
Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

स्मार्टफोन निर्मिती कंपनी वनप्लसच्या काही फोनमध्ये ५ जी वापरता येत असल्याचे दिसून येते. मात्र काही जुने फोन अपडेट मारण्याची गरज आहे.

  • oneplus 8
  • oneplus 8 pro
  • oneplus nord 2
  • oneplus 9 R

(VIDEO : उडणाऱ्या कारमधून प्रवास शक्य, दुबईत XPENG X2 ची झाली चाचणी, इतकी आहे सर्वोच्च स्पिड)

२) अ‍ॅपल

अ‍ॅपलच्या बाबतीत चित्र वेगळेच आहे. नवे आणि जुने असे कोणतेही आयफोन ५ जी वापरण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान भारतातील ग्राहकांना ५ जी सेवा वापरता येण्यासाठी कंपनी डिसेंबर महिन्यात सॉफ्टवेअर अपडेट देणार असल्याचे समजले आहे. पुढील फोन्सना अपडेटची गरज आहे.

  • Apple iPhone 12 Mini
  • Apple iPhone 12
  • Apple iPhone 12 Pro
  • Apple iPhone 12 Pro Max
  • Apple iPhone 13 Mini
  • Apple iPhone 13
  • Apple iPhone 13 Pro
  • Apple iPhone 13 Pro Max
  • Apple iPhone SE-2022
  • Apple iPhone 14
  • Apple iPhone 14 Plus
  • Apple iPhone 14 Pro
  • Apple iPhone 14 Pro Max

(लघुग्रहांपासून पृथ्वीला मिळणार सुरक्षा, NASA ची ‘ही’ चाचणी ठरली यशस्वी)

३) सॅमसंग

Galexy Z flip 4 आणि Galaxy Z fold 4 हे स्मार्टफोन एअरटेल ५ जी सेवेशी सुसंगत आहेत, मात्र काही जुने फोन जसे नोट २० अल्ट्रा आणि एम ५२ यांना ५ जी नेटवर्कसाठी सॉफ्टवेअर अपडेट देण्याची गरज आहे. सॉफ्टवेअर अपडेट लागणारे फोन पुढील प्रमाणे आहेत.

  • Samsung Galaxy Note 20 Ultra
  • Samsung Galaxy S21
  • Samsung Galaxy S21 Plus
  • Samsung Galaxy S21 Ultra
  • Samsung Galaxy Z Fold 2
  • Samsung F42
  • Samsung A52s
  • Samsung M52
  • Samsung Flip3
  • Samsung Fold3
  • Samsung A22 5G
  • Samsung S20FE 5G
  • Samsung M32 5G
  • Samsung F23
  • Samsung A73
  • Samsung M42
  • Samsung M53
  • Samsung M13