प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्कने ट्विटर घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. यामध्ये करण्यात येत असलेले बदलांना योग्य म्हणत आहे तर काही जण टीकाही करत आहेत. अलीकडेच ट्विटरने वापकर्त्यांसाठी ट्विटर ब्ल्यू लाँच केले आहे. ट्विटर ब्लू मध्ये, लोकांना खात्यावर ब्लू टिक्स मिळतात आणि अनेक प्रीमियम सेवा मिळतात ज्या सामान्य वापरकर्त्यासाठी उपलब्ध नाहीत. दरम्यान Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफार्म देखील ब्ल्यू टिक साठी पैसे आकारू शकते. इंस्टाग्रामवर २ अब्जांपेक्षा अधिक वापरकर्ते सक्रिय असतात. सध्या इंस्टाग्राम वापरकर्त्यांकडून कोणतेही पैसे घेत नाही.
रिव्हर्स इंजिनिअर Alessandro Paluzzi ने सांगितले की, लवकरच इंस्टाग्राम ट्विटर सारखे ब्ल्यू टिक साठी पैसे आकारू शकते. कारण त्याने एक कोड दाखवला ज्यात पेड व्हर्जनचा उल्लेख होता. Alessandro Paluzzi ने TechCrunch सोबत एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
या कोडवरून हे कळते की, लवकरच मेटा, फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही लाटफॉर्मवर ब्ल्यू टिक या फीचरसाठी पैसे घेऊ शकते. यया कोडमधील IDV चा अर्थ हा ओळख पडताळणी आहे. मात्र मेटा आणि इंस्टाग्रामने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.म्हणूनच इंस्टाग्राम देखील ब्ल्यू टिकसाठी पैसे आकारले हे म्हणणे घाईचे आहे. इंटरनेटवरील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, इंस्टाग्राम देखील ब्ल्यू टिकसाठी ट्विटरप्रमाणेच पैसे आकारू शकते. मात्र कंपनीने यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.