lucky ios users got Facebook messenger like feature on whatsapp | Loksatta

चॅट होणार आणखी मजेदार, व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाले फेसबुक सारखे फीचर, काय आहे खास? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपकडून एकापेक्षा अधिक फोनवर एकच खाते उघडण्याचे वैशिष्टये उपलब्ध करण्यात आले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने आणखी नवा फीचर जारी केला आहे.

चॅट होणार आणखी मजेदार, व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाले फेसबुक सारखे फीचर, काय आहे खास? जाणून घ्या
whatsapp (pic credit – pixabay)

अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपने अनेक फीचर्स लाँच केले आहेत. ग्रुपमधील सदस्यांची क्षमता हजारावर वाढवण्यात आली आहे. कम्युनिटी फीचर, व्हिडिओ कॉलिंगमधील सदस्यांची वाढ या काही नवीन सोयी देण्यात आल्या आहेत. तसेच, एकापेक्षा अधिक फोनवर एकच खाते उघडण्याचे वैशिष्टये देखील उपलब्ध करण्यात आले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने आणखी नवा फीचर जारी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर फेसबुक मेसेंजर प्रमाणे प्रोफाइल पिक्चर दाखवते. हे पिक्चर तेच लोक बघू शकतात जे त्यांच्यासोबत मेसेज ग्रुपमध्ये आहेत. सध्या हे फीचर काही मोजक्या आयओएस युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. यापूर्वी कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये मेसेज पाठवल्यास केवळ नाव आणि त्या खालील मेसेज दिसून यायचा. मात्र, नवीन फीचरद्वारे आता युजरला ग्रुप चॅटमध्ये मेसेज पाठवणाऱ्या सदस्याचे प्रोफाइल पिक्चर देखील पाहता येईल. काही मोजक्या आयओएस युजर्सना हे नवीन वैशिष्ट्य दिसून आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या सर्व युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करेल अशी आशा आहे.

(गिगबेंचवरील तो फोन असू शकतो GOOGLE PIXEL FOLD, लाँच आणि किंमतीबद्दल मिळाली ‘ही’ माहिती)

व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले अवतार फीचर, असे वापरा

व्हॉटसअ‍ॅपवर नवे अवतार फीचर रोल आऊट करण्यात आले आहे. या फीचरचा वापर करून युजर्सना ईमोजीप्रमाणे अवतार शेअर करता येणार आहे. हे फीचर म्हणजे तुमचे स्वरूप शेअर करता येण्याची संधी आहे. तुम्हाला एखादा मेसेज पाहून काय वाटले यासाठी ‘अवतार’ शेअर करून व्यक्त होऊ शकता. याआधी हे फीचर फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध होते, आता हे व्हॉटसअ‍ॅपवरही उपलब्ध झाले आहे. हे फीचर कसे वापरायचे जाणून घ्या.

  • व्हॉटसअ‍ॅप उघडून त्यामध्ये स्टिकर्स पर्याय निवडा.
  • आयफोनमध्ये हा पर्याय चॅटबॉक्सवरच उपलब्ध असेल.
  • अँड्रॉइडमध्ये इमोजी आयकॉनवर क्लिक करा. त्यामध्ये सर्वात खाली जीआयएफ पर्याया शेजारी तुम्हाला स्टीकर्स पर्याय दिसेल.
  • जर तुम्ही पहिल्यांदा हा पर्याय निवडला तर तुम्हाला अवतार क्रिएट करावा लागेल, यासाठी ‘गेट स्टारटेड’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या त्वचेचा रंग, केसांचा प्रकार, डोळे, चेहरा यांची निवड करा.
  • एकदा तुमचा अवतार निवडून झाल्यानंतर ‘डन’ पर्याय निवडा.
  • व्हॉटसअ‍ॅपवर तुम्हाला फ्रंट कॅमेरा उघडून अवतार निवडण्यासाठी मदत करण्यात येते, तुम्हाला अवतार निवडण्यात अडचण येत असेल तर हा पर्याय वापरू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:51 IST
Next Story
गिगबेंचवरील तो फोन असू शकतो GOOGLE PIXEL FOLD, लाँच आणि किंमतीबद्दल मिळाली ‘ही’ माहिती