गेल्या वर्षी अ‍ॅपलने भारतात मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर फॉक्सकॉनमध्ये हँडसेटचे चाचणी उत्पादन सुरू केले होते. कंपनी भारतात आधीच आयफोन ११ आणि आयफोन १२ तयार करत आहे. आता अ‍ॅपलच्या नवीनतम आयफोन १३ मॉडेलचे उत्पादन देखील सोमवारी सुरू झाले आहे. पीटीआयने वृत्त दिले आहे की, अ‍ॅपलने चेन्नईतील फॉक्सकॉन प्लांटमध्ये आयफोन १३ चे उत्पादन सुरू केले आहे. यापूर्वी पहिला आयपोन मॉडेल आयफोन SE भारतात बनवला गेला होता, ज्याची घोषणा कंपनीने २०१७ मध्ये केली होती. अ‍ॅपलने स्मार्टफोन निर्माता फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन यांच्याशी करार केला आहे. या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करण्यासाठी भागीदार आहेत. गेल्या वर्षी भारतात आयफोन विक्रीमध्ये तेजी दिसून आली आहे. प्रीमियम फोनमध्ये ४४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. देशांतर्गत स्मार्टफोन उत्पादनाला चालना देण्यासाठी उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनसह १६ कंपन्यांना २०२० मध्ये सरकारने मंजूरी दिली आहे. या तिन्ही कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत भारतात एकूण सुमारे ६,८०० कोटी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

अ‍ॅपलचा लेटेस्ट आयफोन ‘मेड इन इंडिया’ असेल. अशा स्थितीत त्याच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अ‍ॅपलच्या या फोन निर्मितीच्या खर्चात कपात होऊ शकते. अ‍ॅपलचे प्लांट तामिळनाडू आणि कर्नाटकात आहेत. दुसरीकडे, तैवानची पेगाट्रॉन देखील या महिन्यात भारतात आयफोन १२ चे उत्पादन सुरू करू शकते.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Highest production of mustard in the country this year pune news
देशात यंदा मोहरीचे उच्चांकी उत्पादन? १२०.९० लाख टन उत्पादनाचा अंदाज
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

Google Maps मध्ये नवं अपडेट, टोल टॅक्सबाबत आधीच माहिती मिळणार

अ‍ॅपल कंपनीने सांगितले आहे की, भारतातील त्यांच्या अनेक पुरवठादार साइट्स आता ऑपरेशनसाठी सौर आणि पवन ऊर्जा वापरत आहेत.भारतात तयार होणाऱ्या आयफोनमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा निर्माण होत नाही. गेल्या वर्षी कंपनीने १०८ टक्के वाढ नोंदवली होती. याव्यतिरिक्त,२०२० मध्ये त्यांचे ऑनलाइन स्टोअर लाँच केल्यानंतर भारतात ऍपल स्टोअर लाँच करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवतील.