मोबाईल आणि इंटरनेट रोजच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टींच्या मदतीने ऑनलाईन पैशांचे व्यवहार, कपडे किंवा घरातील वस्तु ऑर्डर करणे अशी अनेक कामं आपण एका क्लिकवर घरबसल्या करू शकतो. यांमध्ये बऱ्याच वेळा आपले लोकेशन त्या संबंधित वेबसाईटबरोबर शेअर करावे लागते. पण त्या ऑर्डरची डिलीव्हरी झाल्यानंतरही तुमच्या डिवाइसचे लोकेशन त्या वेबसाईटद्वारे ट्रॅक केले जाऊ शकते. यापासून कशी सुटका मिळवायची जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गूगल क्रोममध्ये ओपन करण्यात आलेल्या प्रत्येक वेबसाईटद्वारे तुमच्या डिवाईसचे लोकेशन ट्रॅक केले जाण्याची शक्यता आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गूगल क्रोममध्ये एक बदल करू शकता.

आणखी वाचा : फोन सतत गरम होतो का? ‘ही’ ट्रिक वापरून करा कायमचा उपाय

गूगल क्रोमच्या ट्रॅकिंग फीचरपासून वाचण्यासाठी तुम्ही गूगल क्रोमला ‘डु नॉट ट्रॅक’ ही रिक्वेस्ट पाठवू शकता. आपण काय सर्च करतो याचा डेटा वेबसाईटसद्वारे सेव्ह केला जातो, ज्यामुळे युजर्सना त्याप्रकारचा कन्टेन्ट, जाहिराती दाखवण्यास मदत मिळते. ‘डु नॉट ट्रॅक’ ही रिक्वेस्ट पाठवून तुम्ही हे थांबवु शकता.

डेस्कटॉपवरून अशी पाठवा रिक्वेस्ट

  • डेस्कटॉपवरून रिक्वेस्ट पाठवण्यासाठी तुमच्या लॅपटॉपवर गूगल क्रोम उघडा. त्यानंतर उजव्या बाजुला असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • त्यामध्ये सेटिंग्स पर्याय निवडा. त्यामधील प्रायवसी अँड सिक्योरिटी पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर कुकीज अँड अदर साईड डेटा या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘सेंड अ डु नॉट ट्रॅक रिक्वेस्ट विथ युअर ब्राउजिंग ट्रॅफिक’च्या टॉगलवर क्लिक करा.
  • स्मार्टफोनमधुन गूगल क्रोमला रिक्वेस्ट पाठवण्यासाठी याच स्टेप्स वापरा.
  • अशाप्रकारे तुम्ही तुमचा फोन ट्रॅक होण्यापासून थांबवु शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make this change in google crome no websites will be able to track your location pns
First published on: 07-10-2022 at 11:30 IST