Tech Industry Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. याचा भारतातील कंपन्यांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागला आहे. इतर प्रमुख कंपन्यादेखील अशीच कर्मचाऱ्यांची कपात करत आहे तर काही त्याबद्दल विचार करत आहेत.या कंपन्यांना लॉकडाउनचा बसलेला फटका व त्यानंतर त्यांचे वाढलेले खर्च यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा अशी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे. गोल्डमन सॅक्सनेही भारतातील जवळपास ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत ते आपण पाहुयात.

ShareChat

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शेअरचॅट कंपनीने ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. नवीन वर्षात सुद्धा कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. शेअरचॅट आणि मोज या मूळ कंपन्यांची मोहाला टेक ही कंपनी आहे. यामध्ये २० टक्के किंवा ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

Ola

ओला या कंपनीने त्यांच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून ओला कॅब, ओला इलेक्ट्रिक, ओला फायनान्शिअल सर्व्हिसेस व्हर्टिकलमधून २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची सुरुवात केली आहे. सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. कंपनीने आपले लक्ष हे आता अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळवले आहे. ओला कंपनी तिच्या इलेक्ट्रिक व्हर्टीकलसाठी ५००० इंजिनिअर्सची नियुक्ती करू शकते.

हेही वाचा : Google Layoffs: Google ने कामावरून काढून टाकताच महिला झाली भावूक; म्हणाली, “बॉसला फोन केला अन्…”

Amazon

१८ जानेवारी २०२३ पासून १८००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचे Amazon ने अलीकडेच जाहीर केले होते. अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे हे करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे होते. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या घोषणेपेक्षा ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Byju’s

EdTech जायंट बायजूस या कंपनीने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मार्च महिन्यात ५ टक्के म्हणजे ५०,००० कामगारांची कपात करण्याचे जाहीर केले होते. कंपनीने केरळमधील मीडिया कंटेन्ट विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांची कपात ही प्रतिकूल व्यापक आर्थिक घटकांवर झालेल्या परिणामांमुळे आहे असे कंपनीचे सीईओ बायजा रवींद्रन म्हणाले.

Dunzo

फास्ट ग्रोसरी वितरित करणारी कंपनी डुंझोने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टीमच्या स्ट्रक्चर व नेटवर्कच्या डिझाइनकडे लक्ष देत आहे असे कंपनीचे सीईओ कबीर बिस्वास म्हणाले.

हेही वाचा : मायक्रोसॉफ्टनंतर आता IBM कंपनी करणार नोकरकपात; ३९०० कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

IBM 

आयबीएम ही एक टेक कंपनी असून, या कंपनीने ३,९०० कमर्चाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. या मागचे कारण हे कंपनी आपली काही मालमत्ता विकत आहे, त्यामुळेच ही कपात करण्यात येत आहे.

IBM कंपनी अजूनही क्लायंट-फेसिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी वचनबद्ध असल्याचे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानॉफ यांनी एका जागतिक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. कर्मचाऱ्यांची होणारी कपात ही त्याच्या किंडरिल व्यवसायाच्या स्पिनऑफशी आणि त्याच्या AI युनिट वॉटसन हेल्थच्या भागाशी संबंधित आहे ज्यावर जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये ३०० करोड डॉलरचे शुल्क लागणार आहे. टाळेबंदीनंतर कंपनीचे शेअर २ टक्क्यांनी घसरले आहेत.

Spotify 

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. स्काय न्यूज आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये जवळपास ५ टक्के कर्मचारीकपात केली जाणार आहे. या कारवाईअंतर्गत एकूण ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यात आहे. आजपासूनच त्याची सुरुवात होणार असून मुख्यत्वे मनुष्यबळ आणि इंजिनिअरिंग या विभागांत ही नोकरकपात केली जाऊ शकते.

Twitter

अब्जाधीश एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा मालकी हक्क मिळवल्यापासून या कंपनीत अनेक बदल झाले आहेत. ट्विटरमध्ये मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात साधारण ५० टक्के कर्मचारीकपात करण्यात आली आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा ट्विटरकडून आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. प्रोडक्ट विभागासह अन्य काही विभागातील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होऊ शकते.