ट्विटरप्रमाणेच मेटाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक टूल आणले आहे. महिलांना ऑनलाइन ट्रोलिंगपासून यामुळे संरक्षण मिळणार आहे. या टूलद्वारे महिला आपली ओळख जाहीर न करता ट्रोल करणाऱ्यांची तक्रार करू शकतात. परवानगीशिवाय लैंगिक फोटो शेअर केला असल्यास फ्लॅग रेज करू शकतात. त्यानंतर फोटो आपोआप काढून टाकला जाईल. ज्या महिलांना इंग्रजी येत नाही त्यांनाही त्यांच्या स्थानिक भाषेत तक्रार करता येणार आहे. महिला फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर स्थानिक भाषेत तक्रार करू शकतील. आता १२ भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्‍ध आहे.

मेटा प्लॅटफॉर्मच्या संचालक (ग्लोबल सिक्युरिटी पॉलिसी) करुणा नैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मेटाच्या या उपक्रमामुळे महिलांना भाषेच्या कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. “तक्रार केल्यावर हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांकडून त्यांचा फोटो घेत नाही. मात्र एका युनिक आयडीद्वारे विवादित पोस्टवर कारवाई केली जाते. फोटो अपलोड होताच फेसबुकचे ऑटोमॅटिक टूल्स ते स्कॅन करतात. मेटाने सेंटर फॉर रिसर्च (CSR) आणि रेड डॉट फाऊंडेशन सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर महिलांना सुरक्षा दिली जाईल.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Three major announcements for RBI customers investors
रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके

ट्विटरवर संमतीशिवाय इतरांचे फोटो शेअर करता येणार नाही; कारण…

कंपनीने स्टॉप एनसीआयआय डॉट ओआरजी (StopNCII.org) नावाचा एक प्लॅटफॉर्म देखील सुरू केला आहे. ज्याचा उद्देश गैर-सहमतीच्या गोपनीय फोटोंचा प्रसार थांबवणे देखील आहे. मेटाच्या मते, भारतातील केवळ ३३ टक्के महिला सोशल मीडियाचा वापर करतात, तर पुरुषांची संख्या ६७ टक्के आहे. महिला सोशल मीडियावर न येण्यामागे सुरक्षितता हे सर्वात मोठे कारण आहे. त्यांच्या फोटोंचा गैरवापर होण्याची भीती नेहमीच असते.