Meta ही फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. हीच Meta कंपनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. मेटा टेक्स्ट आधारित अपडेट कंटेट शेअर करण्यासाठी किंवा पोस्ट करण्यासाठी एका App वर काम करत आहे. हे अ‍ॅप ActivityPub वर आधारित असणार आहे जे सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे. याचा वापर मास्टोडॉनद्वारे देखील केला जातो. जे ट्विटरचे प्रतिस्पर्धी आहे.

मेटा ज्या अ‍ॅपवर काम करत आहे त्या अ‍ॅपला P92 हे कोडनेम देण्यात आले आहे. रिपोर्टनुसार हे येत्या काळामध्ये अ‍ॅपचे ब्रॅडिंग इंस्टाग्रामच्या अंतर्गत केले जाणार आहे. म्हणजेच इंस्टाग्राम वापरकर्ते त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड रजिस्टर करून या अ‍ॅपचा वापर करू शकणार आहेत.

Palghar Worker Fatally Stabbed, Altercation, tarapur BARC, INRP Construction Site, Security Concerns, palghar news,
तारापूर बीएआरसी केंद्राच्या परिसरात खून करण्याचा प्रयत्न, स्थानिक कंत्राटी कामगार गंभीर
Pune Satara Highway, Pune Satara Highway Toll Collection Rules, Pune Satara Highway Toll Collection Rules Clarified No Extension, No Extension Granted Beyond 2023, pune, satara, pune news, road news, toll news, Ravindra Chavan
पुणे-सातारा महामार्गावर टोल वसुलीसाठी मुदतवाढ नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांची स्पष्टोक्ती
Colaba Bandra SEEPZ Metro, metro 3, Cost of metro 3 Soars to 37276 Crore, JICA Grants Additional 4657 Crore Loan for Mumbai metro 3, Japan International Cooperation Agency, Mumbai news, metro news
मेट्रो ३ साठी जायकाकडून मिळणार ४६५७ कोटीचे कर्ज, कर्जाच्या शेवटच्या टप्प्याच्या वितरणासाठी केंद्र आणि जायकामध्ये करार
Bareli Home Guard Controls Traffic With His Unique Dance Moves
बरेलीच्या रस्त्यावर होम गार्ड डान्स स्टेप्सच्या मदतीने करतोय वाहतूक नियंत्रण, VIDEO एकदा पाहाच
Kotak Group is the beneficiary of Adani stock fall The Hindenburg revelations claim that the costs outweigh the benefits
‘के’ म्हणजे कोटक समूहच अदानींच्या समभाग पडझडीची लाभार्थी! हिंडेनबर्गच्या खुलाशात नफ्यापेक्षा खर्चच अधिक झाल्याचा दावा
Jio New 5G Plans
Jio New 5G Plans: जिओकडून नव्या ५ जी प्लॅन्सची घोषणा; नव्या दरांमुळे लागणार युजर्सच्या खिशाला कात्री; वाचा संपूर्ण यादी!
From June 2026 India will require all new smartphones tablets to have USB C charging ports to simplify charging and reduce electronic waste
मोबाईल असो की लॅपटॉप आता एकच असेल चार्जर; भारतात लवकरच लागू होणार हा नियम; काय होईल फायदा?
Pune, Central Railway, New Rooftop Solar Plant on Diesel Loco Shed Ghorpadi, Rooftop Solar Plant, Save Rs 52 Lakh Annually, solar plant, central railway, pune, pune news,
रेल्वे वाचविणार वर्षाला ५२ लाख रुपये! विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘अपारंपरिक’ पर्याय

हेही वाचा : Russia-Ukraine युद्धविरामासाठी ChatGpt ने सांगितले विविध उपाय! शशी थरूर म्हणतात, “वेगवगेळी विचारसरणी …”

मेटाने हे मेनी केले आहे की ते सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉलवर काम करत आहे. मेटाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार , कंपनी टेक्स्ट अपडेट करण्यासाठी विकेंद्रित सोशल नेटवर्क शोधत आहे. यामुळे क्रिएटर्स आणि सार्वजनिक व्यक्ती त्यांचा इंटरेस्ट शेअर करू शकतात. सध्या तरी मेटा या नवीन अ‍ॅपची डेव्हलपमेंट सुरु केली आहे की नाही हे कळू शकलेले नाही. रिपोर्टच्या माहितीनुसार या अ‍ॅपवर सध्या कंपनीकडून काम सुरु आहे.

ट्विटरला टक्कर देणार मेटाचे अ‍ॅप

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून , ट्विटर आपल्या वापरकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे हे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीमध्ये मेटाचे हे नवीन अ‍ॅप ट्विटरच्या अडचणी वाढवू शकते. तसेच या अ‍ॅपमुले मेटाला देखील फायदा होणार आहे. भारतात TikTok वर बंदी असताना इंस्टाग्रामने रिल्स फिचर लॉन्च केले होते. या फीचरला इंस्टाग्राम वापरकर्ते सार्वधिक पसंती देतात.

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

P92 चे फीचर्स

P92 मध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध असणार आहे असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये क्लिकेबल लिंक्स, वापरकर्त्यांची प्रोफाइल, इमेज आणि व्हिडीओ तसेच इतर वापरकर्त्यांना लाईक आणि फॉलो करता येणार आहे. मात्र याच्या पहिल्या टप्प्यात वापरकर्ते इतरांच्या पोस्टवर कमेंट करू शकतात की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.