Facebook हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. काही वर्षांपूर्वी या फेसबुकमध्ये Inbox हा ऑप्शन होता ज्यातून वापरकर्ते एकाच वेळी फेसबुकही वापरू शकत होते आणि लोकांशी संवाद साधू शकत होते. २०१४ मध्ये फेसबुकने अ‍ॅपमधून इनबॉक्स हा पर्याय काढून टाकला होता. त्यानंतर फेसबुक आणि मेसेंजर या दोन अ‍ॅप्सची स्वतंत्रपणे जाहिरात केली होती. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी तेव्हा सांगितले होते की, या निर्णयामुळे लोकांना चांगला अनुभव मिळेल. मात्र आता जवळपास दहा वर्षानंतर फेसबुक लवकरच अ‍ॅपमध्ये इनबॉक्स हा ऑप्शन पुन्हा आणू शकते.

फेसबुक आणि मेसेंजर हे दोन्ही स्वतंत्र असल्यामुळे वापरकर्त्यांना फेसबुकवरील आलेले मेसेज पाहण्यासाठी मेसेंजर अ‍ॅपची गरज लागत होती. मेटाच्या या निर्णयामुळे त्यांना २ वेगवेगळी अ‍ॅप्स वापरायला लागू नये म्हणून अनेक वापरकर्त्यांनी Facebook Lite वापरायला सुरुवात केली. पण आता जवळपास १० वर्षांनंतर फेसबुक पुन्हा अ‍ॅपवर इनबॉक्सचा पर्याय आणण्याचा विचार करत आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
IPL 2024 R Ashwin Scolds Fans Over booing Hardik Pandya
IPL 2024: “तुम्ही इतर देशांमध्ये खेळाडूंच्या चाहत्यांना असं भांडताना पाहिलंय का?” हार्दिकला ट्रोल करत असलेल्या चाहत्यांना अश्विनने सुनावले
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

हेही वाचा : लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याच्या दाव्यावर HDFC बँकेचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आमच्या सिस्टीममध्ये …”

सुप्रसिद्ध सोशल मीडिया विश्लेषक Matt Navarra यांनी एक ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये फेसबुक लोकांना नवीन चॅटिंगचा अनुभवाची टेस्टिंग घेण्यास सांगत आहे. लवकर मेसेंजरला फेसबुकसह कनेक्ट केले जाऊ शकते असे कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र या नवीन चॅट ऑप्शनमध्ये वापरकर्त्यांना कोणते फीचर्स मिळतील आणि ते कधीपासून मिळतील याबद्दल माहिती समोर आलेली नाही. मेसेंजर फेसबुकसह इंटिग्रेट झाल्यास वापरकर्ते तिथून त्यांच्या इनबॉक्समध्ये प्रवेश करू शकतील.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पेड सर्व्हिसची घोषणा केली होती. सध्या ही सेवा काही देशांमध्ये सुरु करण्यात आली आहे. तसेच कंपनीने नुकतेच रिल्स निर्मात्यांसाठी रिलची मर्यादा ६० वरून ९० सेकंद इतकी करण्यात आली आहे.