Micromax In Note 2 झाला लॉन्च, ४८ MP कॅमेर्‍यासह मिळतील हे फिचर्स

मेक इन इंडिया अंतर्गत, Micromax ने भारतात नवीन Micromax IN Note 2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जाणून घेऊयात याची किंमत, फिचर्स आणि बरंच काही…

Micromax-In-Note-2-
(फोटो सोर्स : फाइनेंशियल एक्सप्रेस)

मेक इन इंडिया अंतर्गत, Micromax ने भारतात नवीन Micromax IN Note 2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. असं सांगितलं जात आहे की, हा स्मार्टफोन नोट 1 मधील मायक्रोमॅक्सचे अपग्रेड व्हर्जन आहे. दुसरीकडे, Micromax IN Note 2 चे डिझाईन पाहता, हा नवाकोरा स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Series वरून प्रेरित आहे. Micromax IN Note 2 च्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्लेसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. चला जाणून घेऊया Micromax IN Note 2 चे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…

Micromax IN Note 2 फिचर्स
Micromax च्या नवीन स्मार्टफोनमध्ये मागील पॅनलवर LED फ्लॅशसह चार रियर कॅमेरे, ४८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ५ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

आणखी वाचा : Samsung अफॉर्डेबल फ्लॅगशिप फोन Galaxy S21 FE 5G बाजारात आला, काय आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन, जाणून घ्या

Micromax IN Note 2 चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल-एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन ५५० nits पीक ब्राइटनेस, ४६६ पिक्सेल आणि २०:९ आस्पेक्ट रेशोसह येतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे.

Micromax IN Note 2 च्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर, यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G95 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी यामध्ये G76 GPU देण्यात आला आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB UFS 2.1 स्टोरेज आहे.

आणखी वाचा : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेलाय? CEIR वर असं करू शकता ब्लॉक; काय असतं KYM? जाणून घ्या

Micromax IN Note 2 ची किंमत
४ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण इंटरोडक्टरी किंमतीसह फोन १२,४९० रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून ३० जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

आणखी वाचा : तुमच्या फोनमध्ये हे Privacy-Protection Tools आहेत? कसा करायचा वापर आणि सुरक्षितता कशी मिळवायची? जाणून घ्या

Micromax IN Note 2 ची कनेक्टिव्हिटी
या Micromax स्मार्टफोनला ४ G ड्युअल-सिम, ब्लूटूथ, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, GPS, VoLTE आणि ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्ट मिळेल. दुसरीकडे, बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास, याला मजबूत ५००० mAh बॅटरीसह ३० w फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Micromax in note 2 launched in india know the price specifications and features prp

Next Story
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी तुम्ही कोणतेही चार्जर वापरता का? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी