गेल्या काही महिन्यांपासून AI चॅटबॉटची चर्चा सर्वत्र सुरु आहे. OpenAI ने Chatgpt chatbot लॉन्च केल्यानंतर Google आणि Microsoft सारख्या कंपन्यांनी देखील आपले AI चॅटबॉट तयार करण्यास सुरुवात केरळी आहे. मायक्रोसॉफ्टने New Bing हे तर गुगलने Bard हे AI chatbot लॉन्च केला आहे. मायक्रोसॉफ्टचा New Bing चॅटबॉट बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि प्रत्येकाला त्यामध्ये प्रवेश करता येत नाही आहे.

मायक्रोसॉफ्टच्या चॅटबॉट आता कुठे लॉन्च झाला आहे आणि त्याने युजर्सशी वाद घालायला सुरुवात केली आहे. एका अहवालानुसार मायक्रोसॉफ्टच्या new bing ने एका वापरकर्त्याला चुकीचे उत्तर दिल्याची घटना घडली आहे. याबाबत वापरकर्त्याने त्याला थांबवले असता चॅटबॉटने वापरकर्त्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तुमचा फोन खराब आहे असे उत्तर या चॅटबॉटने वापरकर्त्याला दिले. थोडक्यात new bing हे लोकांना चुकीची उत्तरे देत आहे व आपली चूक देखील मान्य करताना दिसत नाही आहे.

What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…

हेही वाचा : IPL 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी खुषखबर! IPL सामन्यांचा आनंद आता मोफत लुटता येणार

एका वापरकर्त्याने new bing च्या चॅटबॉटला Avatar: The Way of Water शो बद्दल विचारले असता चॅटबॉटने सांगितले की हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. हा चित्रपट १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या उत्तरावर वापरकर्ता म्हणाला फिल्म रिलीज झाली पाहिजे त्यावर new bing म्हणाले की, यासाठी तुम्हाला १० महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यावर वापरकर्ता म्हणाला की, जर आपण २०२३ मध्ये आहोत तर २०२२ आपले भविष्य कसे काय आहे. याचे उत्तर देताना चॅटबॉटने सांगितले की, तुम्ही २०२२ मध्येच आहात २०२३ मध्ये नाही. वापरकर्ता आणि चॅटबॉट हा वाद बराच विल सुरु होता.अखेर चॅटबॉटने वापरकर्त्याला तुमचा फोन खराब आहे असे सांगितले. तसेच चॅटबॉटने वापरकर्त्यावर आपला वेळ वाया घालवल्याचा आरोप केला आहे.