मायक्रोसॉफ्ट टीमने वॉकी टॉकी फिचर सर्व युजर्ससाठी जारी केलं आहे. पुश टू टॉक फिचर दोन वर्षांपूर्वी लॉन्च केलं होतं. याचा वापर करोना संकटात फ्रंटलाइन वर्कर्सना तात्काळ वापरासाठी झाला होता. आता हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसाठी एक्सेस केलं जाऊ शकते. वॉकी टॉकी फिचर वापरकर्त्यांना विशिष्ट चॅनेलद्वारे त्यांच्या उर्वरित टीमशी कनेक्ट होऊ शकते. विशेष म्हणजे, बाहेरील लोक चॅनलमधील लोकांनी परवानगी दिल्याशिवाय संवाद साधू शकत नाहीत. मायक्रोसॉफ्टचा दावा आहे की, या फीचरमुळे लोकं मोठ्या वॉकी टॉकी उपकरणांपासून मुक्त होतील. हे वायफाय आणि सेल्युलर इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे संवादाचे एक सुरक्षित माध्यम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या, हे फिचर प्री इंस्टॉल नाही. टीम्स सॉफ्टवेअरमध्ये वॉकी टॉकी वापरण्यासाठी अ‍ॅडमिन सेंटरवर जाऊन अ‍ॅप सेटअप पॉलिसीमध्ये जोडावे लागेल. एकदा ऑन केल्यानंतर फिचर पुढील ४८ तासांत अ‍ॅपवर उपलब्ध होईल. वॉकी-टॉकी फिचर आयफोन आणि आयपॅड सारख्या आयओएस मोबाइल उपकरणांवर आणि अँड्रॉइड मोबाइल उपकरणांवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft walkie talkie feature for all users rmt
First published on: 17-01-2022 at 12:59 IST