फ्लिपकार्टवर सेल सरू असून त्यात मिनी प्रोजेक्टरवर मोठी सूट मिळत आहे. सेलमध्ये ४ हजार रुपयांच्या आत मिनी प्रोजक्टर्स उपलब्ध आहेत. या प्रोजक्टरद्वारे तुम्ही घरीच थिएटरप्रमाणे चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. कोणत्या प्रोजेक्टर्सवर मोठी सूट मिळत आहे, याबाबत जाणून घेऊया.

१) झिंक टी ३०० मिनी प्रोजेक्टर

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Samsung company release To Galaxy AI features for flagship devices Check list if your phone is on the list
आनंदाची बातमी! आता सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये येणार AI फीचर्स; पाहा संपूर्ण यादी

फ्लिपकार्टवर ‘Zync T300 Mini Projector’ची मूळ किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, या प्रोजेक्टरवर ४५ टके सूट मिळत असल्याने हा प्रोजेक्टर तुम्ही केवळ ३ हजार २९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. केवळ इतकेच नव्हे, तर कोटक बँक डेबिट कार्डद्वारे प्रोजेक्टर खरेदी केल्यास १५०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो.

(WHATSAPP DATA LEAK : 50 कोटी युजर्सचा डेटा ‘ON SALE’; यात तुम्ही तर नाही ना? असे तपासा)

प्रोजेक्टरमध्ये एलईडी इंटरफेस, ८००x४०० रेझॉल्युशन, ६०० ल्युमेनस ब्राइटनेस मिळते. प्रोजक्टरद्वारे तुम्ही १६ ते १०० इंच पर्यंतच्या स्क्रिनवर चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. प्रोजेक्टर १० फुटांपर्यंत प्रोजक्शन करू शकते.

२) युनिक यूसी २० मिनी प्रोजेक्टर

‘UNIC UC 20 Mini Projector’ची किंमत ४ हजार २५० रुपये आहे, मात्र या प्रोजेक्टरवर १९ टक्क्यांची सूट मिळत असल्याने तो तुम्ही १ हजार ४१९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याचबरोबर, सिटी क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्झॅक्शन केल्यास १५०० रुपयांपर्यंतचा आणखी लाभ मिळत आहे. या प्रोजेक्टरमध्ये एलसीडी चिपसेट मिळत असून तो ४ फुटांपर्यंत प्रोजेक्शन करू शकतो. प्रोजेक्टरपासून ३२०x२४० पिक्सल रेझॉल्युशन, १६:०९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओ आणि ६० ल्युमेनसची ब्राइटनेस मिळते.

(REALME 10 PRO + फोनची किंमत पाहून रेडमीलाही फुटणार घाम; फास्ट चार्जिंग, १०८ एमपी कॅमेरासह मिळतंय बरेच काही)

३) व्रुम टी ३०० एलईडी मिनी प्रोजेक्टर

VRUM T300 LED Mini प्रोजेक्टरची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे, मात्र या प्रोजेक्टरवर ४० टक्के सूट देण्यात आल्याने तुम्ही तो केवळ २ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सिटी बँक क्रेडिट कार्डद्वारे हा प्रोजेक्टर खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. प्रोजेक्टरपासून १०८० पिक्सेल रिझॉल्युशन आणि ३०० ल्युमेनसपेक्षा अधिक ब्राइटनेस मिळते. प्रोजेक्टर ८ फुटांपर्यंत प्रोजेक्शन करू शकते.