MIUI 14 available for Xiaomi : बऱ्याच प्रतीक्षेनंतर शेवटी MIUI 14 शाओमी, रेडमी आणि पोको वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाला आहे. शाओमी त्याच्या नवीन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमला आत्तापर्यंतचा सर्वात अनुकूल आणि सुव्यवस्थित एमआययूआय संबोधत आहे. MIUI 14 मध्ये काही नवीन वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. एमआययूआय १४ मध्ये कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत आणि ते कोणत्या स्मार्टफोनमध्ये दिसून येईल, याबाबत जाणून घेऊया.

MIUI 14 मध्ये नवीन काय आहे?

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

अपडटेमध्ये कर्नल लेव्हल ऑप्टिमायझेशन, हलके सिस्टिम फीर्मवेअर आणि लोअर मेमरी युसेज यांचा समावेश आहे. MIUI 14 हा Xiaomi 12S अल्ट्रा सारख्या डिव्हाइसवर त्याच्या पूर्वजांपेक्षा ६० टक्के स्मूथ चालतो, असा शाओमीचा दावा आहे.

इतर बदलांमध्ये त्रासदायक कायमस्वरुपी सूचना बंद करण्यासाठी टॉगल देण्यात आला आहे. ज्या सूचनांना स्वाइप करून हटवता येत नाही त्यांना बंद करता येईल. त्याचबरोबर, जी MIUI अ‍ॅप्स फार कमी वापरली जातात त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक कम्प्रेशन देण्यात आले आहे. युजरला पूर्वीपेक्षा अधिक कोअर अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करता येणार. केवळ ८ सिस्टिम अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करता येणार नाही.

नवीन फीचर्स

नवीन फीचर्समध्ये लार्ज आयकॉन असणाऱ्या कस्टमायझेबल फोल्डर्सचा आणि फ्लॉवर्स आणि पेट थीम विजगेट, डुप्लिकेटेड फाइल मर्जर आणि सुधारित टेक्स्ट रेकॉग्निशनचा समावेश आहे. एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन आणि लोकल डेटा प्रोसेसिंगच्या माध्यमातून शाओमी चांगल्या गोपनियतेचा दावा करत आहे. नवीन कंट्रोल सेंटर टॉगल युजरला इतर शाओमी उपकरणांशी आणि एक्सेसरीजशी सहज कनेक्ट होऊ देते. फॅमिली फीचरमुळे युजर्सना ९ लोकांपर्यत छायाचित्रे आणि सब्सक्रिप्शन शेअर करू देते.

कोणत्या डिव्हाइसेसना मिळणार MIUI 14?

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सर्वांत आधी MIUI 14 मिळणार आणि हे फोन्स १४ डिसेंबर रोजी उपलब्ध होणार. हा सॉफ्टवेअर अपडेट इथर फोन्सना देखील मिळणार. Xiaomi MIX Fold 2 सह संपूर्ण Xiaomi 12 सिरीजला जानेवारी 2023 मध्ये हा अपडेट मिळेल, असे शाओमीचे अधिकृत अपडेट शेड्यूल सूचित करते. Redmi K50 सिरीजला देखील त्याच वेळी अपडेट मिळेल.

एप्रिल 2023 पर्यंत, Xiaomi Pad 5, Pad 5 Pro आणि Pad 5 Pro 12.4 इंच व्हेरिएंट आणि रेडमी पॅडला MIUI 14 अपडेट मिळेल. MIUI 14 आणखी काही Redmi आणि Poco फोनमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु याबाबत अधिक माहिती सध्या उफलब्ध नाही.