पावसाळा आला आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसात सर्वाधिक टेन्शन स्मार्टफोनचे असते. पाऊस असो वा उष्णता… प्रत्येकालाच कामानिमित्त बाहेर पडावे लागते. पावसात फोन सुरक्षित ठेवण्यासाठी लोक फॉइल किंवा पाउच सोबत ठेवतात. काही वेळा सुरक्षेनंतरही फोन भिजतो आणि खराब होतो. पावसात भिजून तुमचा फोन खराब झाला असेल तर अशा टिप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल सहज ठीक करू शकता.

  • फोन ताबडतोब बंद करा

स्मार्टफोन/फोन पाण्यात भिजला तर लगेच तो बंद करा. फोनमध्ये पाणी गेल्यास शॉर्ट सर्किटही होऊ शकते. फोनची तपासणी करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तसेच, कोणतेही बटण दाबून तपासू नका. फोन प्रथम बंद करणे शहाणपणाचे ठरेल.

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
  • फोनची बॅटरी काढा

जर फोन पाण्यात किंवा पावसात भिजला असेल तर त्यातील बॅटरी काढून टाका, यामुळे फोनची वीज खंडित होईल. तुमच्या फोनमध्ये न काढता येणारी बॅटरी असल्यास, तुम्ही थेट फोन बंद करावा. न काढता येण्याजोग्या बॅटरी असलेल्या फोनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची अधिक शक्यता असते. त्यानंतर तुम्ही फोनवरून फोन कव्हर, सिम कार्ड, मेमरी कार्ड काढून टाका. असे केल्याने शॉर्ट सर्किटचा धोका कमी होईल. सर्व सामान काढून टाकल्यानंतर ते टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्राने स्वच्छ करा. असे केल्याने आतील ओलावा निघून जाईल.

Smartphone Tips : यापुढे तुमचा फोन अजिबात गरम होणार नाही; फक्त वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

  • फोन तांदळामध्ये ठेवा

अ‍ॅक्सेसरीज टिश्यूने साफ केल्यानंतर फोन तांदळामध्ये ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. तांदूळ ओलावा झपाट्याने शोषून घेतो. सर्व सामान तांदळात दाबून भांड्यात ठेवा. फोन तांदळात किमान २४ तास ठेवा.

  • सिलिका जेल पॅक

तांदळापेक्षा सिलिका जेल चांगले आहे. सिलिका जेल पॅक बहुतेक शू बॉक्स, थर्मॉसमध्ये वापरले जातात. सिलिका जेल पॅक अशाकरिता ठेवला जातो जेणेकरून त्यात ओलावा येऊ नये. ते ओलावा काढून टाकते. तुम्ही तुमचा ओला फोनही त्यात ठेवू शकता. यामध्येही तुम्हाला किमान २४ तास फोन ठेवाव लागेल. जर तुमचा फोन ओला असेल तर तो ड्रायर किंवा हीटरमध्ये अजिबात ठेवू नका. यामुळे सर्किट खराब होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या मदतीने फोन सुकवण्याचा प्रयत्न न करणे चांगले.

  • हेडफोन आणि यूएसबी वापरू नका

जर फोन ओला असेल तर त्याच्याशी हेडफोन आणि यूएसबी अजिबात कनेक्ट करू नका. यामुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. फोन चालू झाल्यावर तुम्ही त्यांचा वापर करू शकता. त्यानंतरही फोन ठीक होत नसेल, तर तो सर्व्हिस सेंटरला दाखवा.

  • वॉटरप्रूफ पाउच सोबत ठेवा

मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ पाउच सोबत ठेवू शकता. तुम्हाला ते कोणत्याही ऑनलाइन साइटवर मिळेल. त्याची किंमत देखील फक्त ९९ रुपये आहे. यामुळे तुम्ही तुमचा हजारो रुपयांचा फोन वाचवू शकता.

  • ब्लूटूथ हेडफोन

तुम्हाला पावसात कुठेतरी महत्त्वाच्या ठिकाणी जायचे असेल आणि मोबाईलही हवा असेल तर तुम्ही ब्लूटूथ हेडफोन वापरू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन फॉइल किंवा वॉटरप्रूफ पाउचमध्ये अडकवू शकता आणि खिशात सुरक्षित ठेवू शकता. कॉल आल्यावर तुम्ही ब्लूटूथ हेडफोनसह फोन उचलू शकाल. अनेक ब्लूटूथ हेडफोन वॉटरप्रूफ असतात.