Motorola कंपनीचे ई-सीरीज स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत असणारे स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. आता Motorola ने आपला आगामी ई-सीरीज स्मार्टफोन ‘Moto E32’ भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फोन यापूर्वी ३ मे रोजी युरोपियन बाजारात सादर करण्यात आला होता. आता Motorola ने ७ ऑक्टोबर रोजी भारतात Moto E32 सादर करण्याची घोषणा केली आहे. फोन सादर होण्याआधीच कंपनीने त्याच्या डिझाइन डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील दिली आहे. जाणून घेऊया या फोनची सर्व माहिती…

Moto E32 चे डिझाइन

Moto E32 मध्ये एक प्रीमियम डिझाइन आहे जे उत्कृष्ट व्हिज्युअल पॅटर्नसह तयार केले गेले आहे. यामुळे तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी IP52 वॉटर रजिस्टर डिझाइनसह हा फोन गुळगुळीत, स्टाइलिश आणि मजबूत बनतो. अधिकृत साइटनुसार, Moto E32 ४ जीबी रॅम, ६४ जीबी अंतर्गत स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. हा फोन कॉस्मिक काळा आणि आइसबर्ग निळ्या रंगामध्ये येईल.

Moto E32 चे स्पेसिफिकेशन्स

Moto E32 ला 90Hz रिफ्रेश रेटसह ६.५-इंचाचा HD LCD डिस्प्ले मिळेल. या व्यतिरिक्त हा स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसेसरद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे, याचे अंतर्गत स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने १TB पर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. हे दोन वर्षांच्या OS अपग्रेड आणि सुरक्षा पॅचसह येऊ शकते.

आणखी वाचा : 200 एमपी कॅमेरासह XIAOMI 12 T PRO लाँच, केवळ इतक्या मिनिटांत होणार चार्ज, 12 T मध्येही खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

Moto E32 कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ५०MP प्राथमिक कॅमेरा आणि २MP दुय्यम सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, हा स्मार्टफोन ८MP कॅमेरासह येईल. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये ५,०००mAh बॅटरी आहे, जी १०W चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto E32 किंमत

हा फोन भारतापूर्वी युरोपमध्ये लॉन्च झाला आहे. तेथे या फोनची किंमत 149 युरो (जवळपास 12,000 रुपये) पासून सुरू होते. अशी अपेक्षा आहे की भारतातही हा फोन त्याच किंमतीच्या श्रेणीत येऊ शकतो. Moto E32 भारतात १२ ऑक्टोबरपासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.