मोटोरोलाने भारतात आपला लेटेस्ट G-सिरीज स्मार्टफोन लॉंच केला आहे. सध्याच्या Moto G42 आणि Moto G52 स्मार्टफोन्सप्रमाणे, Moto G32 देखील Qualcomm Snapdragon 680 चिपसेटसह येतोय. Moto G32 मध्ये ५० मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरे आणि मोठी बॅटरी यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. या मोटोरोला फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्वकाही जाणून घ्या…

Moto G32 price
Moto G32 स्मार्टफोन ४ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज सह एकाच व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. हा फोन निवडक युरोपियन बाजारपेठांमध्ये २०९.९९ युरो (अंदाजे रु. १७,०००) मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन मिनरल ग्रे आणि सॅटिन सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये येतो. मोटोरोलाचा हा फोन लवकरच लॅटिन अमेरिकन आणि भारतीय बाजारातही लॉंच होणार आहे.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स

आणखी वाचा : Easyfone Marvel+ Review: खास आजी-आजोबांसाठी बनवलाय हा फोन, आपत्कालीन SOS बटणाचं खास फीचर

Moto G32 specifications
Moto G32 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा LCD डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये पंच-होल उपलब्ध आहे. स्क्रीन फुलएचडी+ रिझोल्यूशन देते आणि ९० Hz चा रिफ्रेश रेट आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. Motorola G32 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU आहे. फोनमध्ये ४ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते.

आणखी वाचा : सॅमसंगची जबरदस्त ऑफर! महागड्या स्मार्टफोनसाठी लॉंच केली Buy now Pay later सेवा

Motorola G32 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये अपर्चर F/१.८ सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी, अपर्चर F/२.२ सह ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि अपर्चर F/२.४ सह २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. या हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर एफ/२.४ आहे. कॅमेरा ३० fps वर फुल-एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

आणखी वाचा : विराट कोहलीच्या हातात दिसला Vivo V25 Pro, १८ ऑगस्ट रोजी भारतात लॉंच होऊ शकतो

Moto G32 स्मार्टफोन Android 12 सह येतो. या फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सरसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. हँडसेटची परिमाणे १६१.७८×७३.८४×८.४९ मिलीमीटर आणि वजन १८४ ग्रॅम आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे जी ३० W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. या मोटो स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, ३.५ mm हेडफोन जॅक आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर यांसारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. याशिवाय, फोन ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.२ आणि NFC कनेक्टिव्हिटी देते.