मोटोरोलाच्या G-सिरीजमधील Moto G72 हा नवीनतम स्मार्टफोन ३ ऑक्टोबर रोजी भारतात लाँच झाला होता. आता कंपनीने हा स्मार्टफोन युरोपमध्येही लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅमसह १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. Moto G72 पहिल्यांदाच आता देशात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टद्वारे ऑनलाइन खरेदी करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Moto G72 चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि ५७६Hz टच सॅम्पलिंग रेटसह ६.६-इंचाचा poOLED डिस्प्ले आहे. Moto G72 Android १२ आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये १०८-मेगापिक्सलचा मुख्य Samsung HM6 कॅमेरा, ८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि २-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये १६-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे.

आणखी वाचा : अर्रर…POCO F5 बाजारात येण्यापूर्वीच लीक; स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि प्रोसेसरबद्दल माहिती झाली उघड

Moto G72 ची बॅटरी
बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०००mAh बॅटरी मिळते. फोनचे वजन १६६ ग्रॅम आहे. Moto G72 हा फोन Meteorite Grey, Mineral White आणि Polar Blue रंगामध्ये सादर करण्यात आला आहे.

Moto G72 किंमत

भारतात Moto G72 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १८,९९९ रुपयांपासून सुरू होते. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून, कंपनी कोटक बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्डंवर १० टक्के सूट देत आहे. Flipkart Axis Bank कार्डवर ५ टक्के कॅशबॅक देखील आहे. तर दुसरीकडे, Moto G72 युरोपमध्ये २६० युरो (जवळपास 21 हजार रुपये) लाँच करण्यात आला आहे. सध्या ते युरोपातील निवडक देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moto g72 goes on sale for the first time in india pdb
First published on: 12-10-2022 at 19:49 IST