मोटोरोलाने आपला नवीन फोन Motorola Edge 40 ला भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mah इतक्या क्षमतेची बॅटरी आहे. यामध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर, 8GB LPDDR4X रॅम आणि ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये इतर अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आली आहेत. हा फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

भारतीय बाजारात या फोनला फक्त एकाच व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 8020 प्रोसेसर दिले आहे. तसेच या फोनला तीन कलर मध्ये मार्केटमध्ये आणले आहे.

pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

फोनची किंमत
या फोनला एकाच व्हेरियंट मध्ये म्हणजे ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये आणले आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून ३० मे पासून सुरू केली जाणार आहे. सध्या या फोनची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. 

कॅमेरा

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन OIS मिळते. दुसरा लेन्स १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते. सोबत 68W TurboPower वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.

हेही वाचा – २०२३ मधील १० हजार रुपयांच्या किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन, उत्कृष्ट आणि आकर्षक असा लूक

फिचर्स

मोटोरोलाने त्यांच्या नवीन मोबाईनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स दिले आहेत. या मोबाईलमध्ये 6.55 इंच FHD आणि कर्व्ड OLED डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे.हा डिस्प्ले 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. यामुळे डिस्प्लेची गुणवत्ता चांगली मिळते. हा मोबाईल IP68 च्या रेटिंगसोबत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे माती, धूळ आणि पाण्यातही खराब  होत नाही. मोटारोलाने त्यांच्या एक ट्विटमध्ये सांगितले की, हा मोबाईल 30 मिनिटापर्यंत पाण्यात राहिला तरी फोनला काहीच होत नाही.