Motorola एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते.मोटोरोलाने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. मोटोरोलाने जी सिरीजमधील नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केले आहेत. जागतिक बाजारात Moto g53 5G आणि Moto G73 5G या स्मार्टफोनचे लाँचिंग कंपनीने केले आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स , किंमतीविषयी जाणून घेऊयात.
Moto G73 5G चे फीचर्स
Moto G73 5G या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुलएचडी प्लस आयपीएस एलसीडी स्क्रीन मिळणार आहे. तसेच फोन स्क्रीनच्या मध्यभागी एक होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येते. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉक हे फिचर देखील यामध्ये येते.
हेही वाचा : Airtel ने लाँच केले ‘हे’ दोन प्रीपेड प्लॅन्स, मिळणार ‘इतका’ जीबी हाय स्पीड डेटा
Moto G73 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 930 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी ५००० mAh क्षमतेची येते. ३० वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे.
Moto G53 5G चे फीचर्स
Moto G53 5G या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले येतो. यात एचडी रिझोल्युशन देखील येते. याची बॅटरी ५०००mAh क्षमतेची आहे. या फोनला १० वॅटचे चार्जिंग सपोर्ट येते. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 480+ हा प्रोसेसर आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज यामध्ये असून मायक्रोएसडी कारच्या मदतीने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येते. फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे सिक्युरिटी फीचर्स यात देण्यात आले आहेत. याचा कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा येतो. १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Moto G73 5G ची किंमत
Moto G73 5G स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. याची किंमत २९९ युरो (२६,५००) रुपये इतकी असणार आहे. हा स्मार्टफोन ल्युसेंट व्हाइट आणि मिडनाईट ब्लू कलरमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
Moto G53 5G ची किंमत
Moto G53 5G या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. याची किंमत २४९ युरो(२२,१००) रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन इंक ब्लू, आर्क्टिक सिल्व्हर आणि गुलाबी रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.