Motorola ने आपल्या ‘E’ सीरीज अंतर्गत Moto E22s हा नवीन स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केला आहे. हा एक स्वस्त लो बजेट मोबाईल फोन आहे जो सध्या युरोपीय बाजारात लाँच झाला आहे. याच सीरीजचा Moto E32s स्मार्टफोन भारतात ९९९९ रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. Motorola Moto E22S चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

Moto E22s किंमत

Motorola Moto E22S युरोपमध्ये फक्त एकाच प्रकारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ४जीबी रॅमसह १२८जीबी अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याची किंमत १५९ युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १२,५०० रुपये आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन आर्क्टिक ब्लू आणि इको ब्लॅक रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

( हे ही वाचा: Redmi 11 Prime 5G फोन भारतात ६ सप्टेंबरला होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..)

Moto E22s तपशील

Motorola Moto E22S स्मार्टफोन ६.५ इंचाच्या HD+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनेलवर तयार केली गेली आहे आणि 90Hz रिफ्रेश दराने काम करते. मोटोरोलाच्या या मोबाइलची परिमाणे १६३.९५x ७४.९४x ८.४९ मिमी आणि वजन १८५ ग्रॅम आहे. Moto E22s ला Android १२ आउट ऑफ द बॉक्स सह सादर केले गेले आहे ज्यामध्ये MediaTek Helio G57 चिपसेट प्रोसेसिंगसाठी उपस्थित आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम मेमरीवर लॉन्च करण्यात आला आहे, जो ६४ जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. Moto E22S च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह सुसज्ज १६ मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, ज्यामध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. त्याचप्रमाणे या मोटोरोला मोबाइलमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.Motorola Moto E22s हा ड्युअल सिम फोन आहे जो ४जी LTE ला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, त्याच वेळी हा मोबाइल फेस अनलॉक फीचरलाही सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, Motorola E22S मध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी १०वोल्ट फास्ट चार्जिंगसह काम करते.