Satellite Connectivity in motorola Phones: मोबाईलमध्ये बऱ्याचदा नेटवर्क मिळत नाही. त्यावेळी काय करावे कळत नाही. परंतु, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei आणि Apple यांनी गेल्या वर्षी त्यांच्या डिव्हाइसवर बेसिक सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची घोषणा केली होती. या फीचर अंतर्गत, युजर्स आपत्कालीन परिस्थितीत नेटवर्कशिवायही कोणाशीही कनेक्ट होऊ शकतात. दरम्यान मोटोरोला कंपनीने Motorola आणि Bullitt Group ने Motorola Defy 2 हा स्मार्टफोन टू-वे सॅटेलाइट मेसेजिंग क्षमतेसह लॉन्च केला आहे. हे डिव्हाईस वापरणारे satellite messaging capabilities ची मेंबरशिप घेऊ शकतात. जे वापरकर्त्यांना मेसेज, लोकेशन शेअरिंग असे नेटवर्कशिवाय पाठवता येणार आहे.

सॅटेलाईट सेवा कशी काम करणार ?

Motorola Defy स्मार्टफोनमध्ये टू- वे सॅटेलाईटवर आधारित टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. जे वापरकर्त्यांना सेल्युलर सर्व्हिस आणि वाय -फाय सर्व्हिस नसतानासुद्धा इतर वापरकर्त्यांशी संपर्क करता येतो. हे अँड्रॉइड फणसाठी पहिले सॅटेलाईट आधारित थेट टू- वे मेसेजिंग सर्व्हिस आहे ज्याला Bullitt Satellite Messenger म्हणतात. थर्ड जनरेशन पार्टनरशिप प्रोजेक्ट (3GPP) द्वारे परिभाषित केलेल्या मानकांचा वापर करून तयार करण्यात आली आहे. 3GPP चा उपयोग मोबाइल टेलिकम्युनिकेशन प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध मानकांचा संदर्भ देण्यासाठी वापरली जाते.

several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : मोबाईल नेटवर्क नाही? तरीही, व्हिडीओ कॉल अन् करा चॅटिंग, ‘या’ स्मार्टफोनमध्ये युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.६ इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले मिळतो. ज्यामध्ये १२० HZ इतका रिफ्रेश रेट येतो. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना MediaTek Dimensity 930 octa-core 2.2GHz हा प्रोसेसर या फोनमध्ये मिळणार आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवत येते.

Motorola Defy 2 and Cat S75 in (iamge credit – Motorola)

Motorola Defy 2 फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि १५W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट येतो. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर असेलला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी वापरकर्त्यांना ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.