scorecardresearch

अंबानींनी लेकाचा साखरपुडा होताच JIO युजर्सना दिली भन्नाट भेट; ‘हे’ 2 स्वस्त रिचार्ज प्लॅन पाहिलेत का?

Reliance Jio Prepaid Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास व पैसे वाचवण्यासाठी या दोन नव्या योजना ग्राहकांच्या कामी येणार आहेत.

अंबानींनी लेकाचा साखरपुडा होताच JIO युजर्सना दिली भन्नाट भेट; ‘हे’ 2 स्वस्त रिचार्ज प्लॅन पाहिलेत का?
अंबानींनी लेकाचा साखरपुडा होताच JIO युजर्सना दिली भन्नाट भेट; 'हे' 2 स्वस्त रिचार्ज प्लॅन पाहिलेत का? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Reliance Jio Prepaid Recharge Plan: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने मोबाईल ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड योजना लॉन्च केल्या आहेत. नव्या Jio योजनांची सर्वात खास बाब म्हणजे यात ग्राहकांना प्रति दिवस अडीच जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास व पैसे वाचवण्यासाठी या दोन नव्या योजना ग्राहकांच्या कामी येणार आहेत. दोन्ही प्लॅन्समध्ये नियमित डेटा, अमर्यादित कॉल्स आणि अनेक सुविधा ऑफर करण्यात आल्या आहेत. या प्लॅन्सची वैधता ९० दिवस म्हणजेच तब्बल ३ महिने असणार आहे. या जिओ प्लॅन्सद्वारे ऑफर केलेल्या फायद्यांबद्दल अधिक तपशील जाणून घेऊयात..

Jio ३४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांच्या प्लॅनचा रिचार्ज केल्यास अमर्यादित कॉलसहित दिवसाला २.५ GB दैनिक हाय-स्पीड डेटा वापरता येऊ शकतो. या प्लॅनची वैधता ३० दिवस आहे. म्हणजेच महिन्याभरात ग्राहकाला प्लॅनद्वारे एकूण ७५ GB डेटा ऑफर केला जाईल. या व्यतिरिक्त, ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातील. वापरकर्त्यांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वापरण्याची परवानगी मिळेल. शिवाय, जिओ या ऑफरसह वेलकम ऑफरचा एक भाग म्हणून ५जी डेटा देखील ऑफर करेल.

Jio ८९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज २.५ GB हाय-स्पीड डेटा आणि दररोज १०० एसएमएस अशी सुविधा मिळेल. हा प्लॅन ९० दिवसांपर्यंत वैध असेल. याचा अर्थ या प्लॅनद्वारे एकूण २२५ जीबी डेटा ऑफर केला जाईल . ८९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा सुद्धा लाभ घेता येईल. या प्लॅनसह वेलकम ऑफरचा एक भाग म्हणून 5G डेटा देखील ऑफर करण्यात आला आहे. .

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 15:57 IST

संबंधित बातम्या