एका लघुग्रहाला त्याच्या मर्गातून हटवण्याच्या कार्यात नासाला यश आले आहे. नासाच्या चाचणीने लघुग्रहांपासून पृथ्वीचे रक्षण होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात नासाच्या डार्ट नावाच्या अंतराळयानाने एका लघुग्रहाला धडक दिली होती. अंतराळयानाच्या धडकेने लघुग्रहाच्या मार्गात बदल झाला असल्याचे नासाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

पृथ्वीच्या रक्षणासाठी नासा प्रयत्नशील असल्याचे या चाचणीतून स्पष्ट झाले आहे, असे नासाचे प्रशासक बिल नेलसन यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना स्पष्ट केले. अंतराळयान एका रेफ्रिजिरेटरच्या आकाराचे होते. ते डिमोर्फोस नावाच्या लघुग्रहाला धडकले. हा लघुग्रह एका फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा असून तो डिडायमोस नावाच्या एका मोठ्या लघुग्रहाभोवती फिरतो.

Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

(VIDEO : उडणाऱ्या कारमधून प्रवास शक्य, दुबईत XPENG X2 ची झाली चाचणी, इतकी आहे सर्वोच्च स्पिड)

अंतराळयाण धडकण्यापूर्वी डिमोर्फोस लघुग्रहाला डिडायमोसची प्रदक्षिणा घालण्यासाठी ११ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागायचा. पण धडकेनंतर डिमोर्फोसला आता ११ तास २३ मिनिटे लागत आहेत. ३२ मिनिटांची घट झाल्याचे दिसून आले आहे. डिमोर्फोस हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक नाही, परंतु त्याचा चाचणीसाठी वापर करण्यात आला.