जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरबदल केले. ट्विटरचे सीईओ पराग अगरवालसह काही उच्च अधिकाऱ्यांना त्यांनी कामावरून काढल्यानंतर कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले. त्यानंतर शुल्कासह ब्ल्यू टीक सेवा सुरू केली. याचा दुरुपयोग होत असल्याचे पाहून ती सेवा स्थगित करण्यात आली. यानंतरही कंपनीत गोंधळ सुरूच आहे. या सर्व घटनांमुळे युजर संतापून आहे. मस्क यांचे जनतेतून कौतुक होताना दिसून आले नाही. मात्र, अशात नेटफ्लिक्सचे सह संस्थापक आणि सहायक कार्यकारी अधिकारी रिड हेस्टिंग यांनी मस्क यांच्यासाठी स्तुती केली आहे. यामुळे मस्क यांचा उत्साह नक्कीच वाढलेला असावा. कारण त्यांनी देखील ट्विटरवर हेस्टिंग यांचे आभार मानले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी डिलबुक समिटमध्ये नेटफ्लिक्सचे सह संस्थापक आणि सहायक कार्यकारी अधिकारी रिड हेस्टिंग यांनी त्यांचे आणि मस्क यांच्यातील वेगळेपण सांगितले. मस्क यांनी ट्विटर घेतल्याबाबत मी उत्साहात आहे. मस्क हे पृथ्वीवरील सर्वात धाडसी आणि सर्वात सर्जनशील व्यक्ती असल्याचे, हेस्टिंग म्हणाले. यावर इलॉन मस्क यांनी देखील ट्विट करत हेस्टिंग यांचे आभार मानले आहे.

(कमाई होईल आणि कौशल्यही दिसेल; जिओच्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये काय आहे खास? जाणून घ्या)

हेस्टिंग यांनी मस्क यांच्याविषयी गौरोद्गार काढले असले तरी नेटफ्लिक्सच्याबाबतीत मस्क यांचे काही सकारात्मक मत दिसून आले नाही. या वर्षीच्या सुरुवातीला मस्क यांनी नेटफ्लिक्सला टोला हाणला होता. नेटफ्लिक्सचे सब्सक्राइबर्स घटल्यानंतर मस्क यांनी वोक माइंड व्हायरसमुळे नेटफ्लिक्स आता पाहण्यायोग्य नाही, असे ट्विट केले होते. मात्र, हेस्टिंग यांनी आता मस्क यांचे कौतुक केल्यानंतर हे ट्विट त्यांच्या मनाला लागले नसल्याचे समजते.

हेस्टिंग पुढे म्हणाले की, मला १०० टक्के खात्री आहे की, मस्क त्याच्या सर्व प्रयत्नांद्वारे ज्यामध्ये ट्विटरच्या खरेदीचा देखील समावेश आहे यातून जगाची मदत करू पाहत आहे. कारण मुक्त संभाषण आणि लोकशाहीच्या सामर्थ्यावर त्याचा विश्वास आहे. परंतु, तो जे करणार, तसे मी करणार नाही, असे हेस्टिंग म्हणाले.

(यूट्यूबची मोठी कारवाई! भारतातील १७ लाख व्हिडिओ हटवले, ‘हे’ आहे कारण)

मस्क ट्विटरमध्ये जे बदल करत आहेत त्यावर लोक आक्षेप घेत आहेत. लोकांनी मस्क यांना थोडा वेळ द्यायला हवा. ट्विटरला लोकशाही आणि समजासाठी अधिक चांगले बनवण्यासाठी मस्कने खूप पैसे खर्चे केले आहे आणि मला त्याच्या प्रयत्नांबाबत सहानुभूती आहे, असेही हेस्टिंग म्हणाले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix co ceo hastings prase elon musk says he is brave and most creative person on the planet ssb
First published on: 01-12-2022 at 10:21 IST