Netflix हे भारतासह जगभरातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेटफ्लिक्सच्या यूजर्संमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते. एकूण ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेमध्ये नेटफ्लिक्स वरच्या स्थानावर असले, तरी त्यांना वाढत्या स्पर्धेचा फटका बसला असल्याचे त्यांच्या कमाईच्या आकड्यांवरुन लक्षात येते. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग संबंधित नियम लागू करायला सुरुवात केली. हे प्रकरण सुरु असताना नेटफ्लिक्सने एक मोठा विक्रम केल्याची माहिती समोर आली. या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतामध्ये तब्बल १ लाख सब्सक्रायबर्स मिळवले आहेत.

Financial express ने दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २७ मे पर्यंत भारतातील १ लाख लोकांनी नेटफ्लिक्समध्ये साइन अप केले आहे. याआधी कंपनीचा साइन अपचा आकडा ७३,००० इतका होता. आपल्या देशामध्ये नेटफ्लिक्सला अपेक्षित यश मिळत नसल्याने ही कंपनी ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपनीने त्यांच्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती कमी केल्या होत्या. यामुळे साइन अप करण्याचे प्रमाण वाढले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काहीजण पासवर्ड शेअरिंग बंद केल्याने असे घडले आहे असे म्हणत आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

आणखी वाचा – Flipkart चा Big Saving Days Sale झाला सुरु; अ‍ॅपल, सॅमसंगसह ‘या’ कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय मोठा डिस्काउंट

नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन प्लॅन्स

नेटफ्लिक्सने त्यांच्या 480p-resolution मोबाइल प्लॅनची एका महिन्याची किंमत १९९ रुपये होती. आता ती १४९ रुपये इतकी आहे. कंपनीचा बेसिक प्लॅन सुद्धा 480p-resolution सह १९९ रुपयांना उपलब्ध आहे. स्टॅन्डर्ड प्लॅनमध्ये तुम्ही एक अकाउंट दोन डिव्हाइसमध्ये वापरु शकता. त्याची क्वालिटी 1080p-resolution असते. यासाठी दर महिन्याला ४९९ रुपये भरावे लागतात. प्रीमियम प्लॅनची किंमत ६४९ रुपये आहे. यात चार डिव्हाइसमध्ये अकाउंट शेअर करता येते. तसेच 4K HDR मध्ये व्हिडीओ कन्टेंट पाहता येतो.

Story img Loader