Netflix introduced three news games : नेटफ्लिक्सवर गेम खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने थ्री किंग्डम्स, कॅट्स अँड सूप आणि हेलो किटी हॅपिनेस परेड हे गेम्स युजर्ससाठी सादर केले आहेत. विशेष म्हणजे, हे गेम्स जाहिरात नसलेल्या नेटफ्लिक्स सदस्यत्वासोबत किंवा इन अ‍ॅप खरेदीसह उपलब्ध होणार आहे. युजर्स आयओएस किंवा अँड्रॉइड स्मार्ट डिव्हाइसमधील नेटफ्लिक मोबाईल अ‍ॅपवर हे गेम्स शोधू शकतात.

१) हेलो किट्टी हॅपिनेस गेम

Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…

हेलो किट्टी हॅपिनेस गेम्सबाबत बोलायचे झाल्यास, या गेमला रोग गेस्मने विकसित केले आहे. गेमध्ये जास्तीत जास्त तीन प्लेअर सहभागी होऊ शकतात जे कॉइन्स गोळा करू शकतील आणि मौजमजेला विरोध करणाऱ्या कुरोमीला विरोधी करतील, अशी माहिती कंपनीने दिली.

(आकर्षक दिसतो Google pixel 7a, लूक झाले लिक; मिळू शकते वायरलेस चार्जिंग, पाहा फोटो)

२) कॅट्स अँड सूप गेम

कॅट्स अँड सूप गेममध्ये प्लेयर्सना ग्राहकांसाठी सूप बनवण्याचे काम दिले जाते. प्लेअर्सना आपल्या साथीदार मांजरींकडून नवीन पाककृती आणि हर्ट्स गोळा करावे लागतील. यासाठी मांजरींना पकडेलेली मासे खायला द्यावी लागतील.

३) थ्री किंग्डम्स

हा कार्ड गेम आहे, ज्यामध्ये प्लेअर युद्ध लढतात आणि राजकारण करतात. डेव्हलपर्सनुसार, या गेममध्ये पुढे जाताना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, योग्य सैन्यासोबत योग्यवेळी भागीदारी करण्यासाठी आणि शक्तिशाली होण्यासाठी प्लेअरला युद्ध, गट आणि नायकांचा सामना करावा लागेल.

नेटफ्लिक्स AAA नावाच्या गेमवर काम करत असल्याचे एका अहवालातून समोर आले होते. हा नेटफ्लिक्सचा पहिला अंतर्गतरित्या विकसित केलेला गेम असू शकतो.