scorecardresearch

Netflix च्या दरात मोठी कपात; नवे दर काय आहेत? वाचा

इतर ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या मासिक शुल्कात वाढ केली असताना नेटफ्लिक्सने आपल्या मासिक शुल्कात कपात केली आहे.

Netflix1
Netflix च्या दरात मोठी कपात; नवे दर काय आहेत? वाचा (Image source: AP)

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असून प्रवासादरम्यान अनेक जण ओटीटीवर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहताना दिसतात. मात्र सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म परवडणारे नसल्याने ठराविक निवडले जातात. त्यात नेटफ्लिक्स हे सर्वात लोकप्रिय ओटीटी आहे. मात्र त्याचं मासिक भाडं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. आता ओटीटी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या मासिक शुल्कात वाढ केली असताना नेटफ्लिक्सने आपल्या मासिक शुल्कात कपात केली आहे. २०१६ पासून नेटफ्लिक्स भारतात सेवा देत असून पहिल्यांदाच आपल्या दरात कपात केली आहे. भारतातील ओटीटीमधील तीव्र स्पर्धा पाहता हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नेटफ्लिक्सच्या दरांमुळे अनेक जण त्याकडे पाठ फिरवत होते. नेटफ्लिक्स डिस्ने+ हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी एंटरटेनमेंटचे ZEE5 आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कचे SonyLIV यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करते.

एंट्री-लेव्हल बेसिक प्लॅनमध्ये ग्राहकांना वेब सीरिज आणि चित्रपट स्टँडर्ड डेफिनिशन (SD) मध्ये एकाच वेळी एकाच मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहता येतात. हा प्लान ४९९ प्रति महिना होता. तो आता १९९ रुपये करण्यात आला आहे. तर टू शेअरिंक स्क्रिन असलेला हाय डेफिनेशन प्लान ६४९ रुपयांवरून ४९९ रुपये करण्यात आला आहे. . तर अल्ट्रा हाय डेफिनेशन चार स्क्रिन शेअरिंग प्लान ७९९ रुपयांवरून ६४९ रुपये करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सची मोबाइल प्लान भारतात जुलै २०१९ पासून १९९ रुपये प्रति महिना होता. आता हा प्लान १४९ रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. नवीन किंमत युजर्सच्या पुढील बिलिंग सायकलपासून लागू होईल.

“नविन प्लान ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येतील. १४ डिसेंबरपासून यांसाठी अपग्रेडशन फिचर आणलं आहे. त्यात स्क्रिनवर पॉपअप येईल आणि नविन योजना अपग्रेड केली जाईल.”, असं मोनिका शेरगिल, नेटफ्लिक्स इंडिया, व्हीपी कंटेन्ट यांनी मनी कंट्रोलशी बोलताना सांगितलं. उदाहरणार्थ, जर युजर्स जुन्या रु. ४९९ बेसिक प्लॅनवर असेल आणि त्यांनी अपग्रेडची पुष्टी केली. तर ते आपोआप पुढील श्रेणी ‘स्टँडर्ड’ वर हलवले जातील. ज्याची किंमत आता ४९९ रुपये आहे. वैकल्पिकरित्या युजर्स कमी किमतीचा लाभ घेण्यासाठी अपग्रेड नाकारूही शकतात.

गुगल फोटोजमध्ये नवं फिचर्स; सिनेमॅटिक मोडपासून पीपल अँड पेट्स विजेट्सचा समावेश

एकिकडे, नेटफ्लिक्सने किमती कमी केल्या आहेत, तर प्रतिस्पर्धी अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅमेझॉन प्राइम सेवेच्या किंमती वाढवल्या आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइमची किंमत आता भारतात प्रति वर्ष १४९९ रुपये आहे. या पूर्वीची किंमत ९९९ रुपये प्रति वर्ष होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netflix reduced prices for plans in india rmt

ताज्या बातम्या