ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता नेटफ्लिक्सकडून पासवर्ड शेअरींगची सुविधा बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नेटफ्लिक्सचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ग्रेग पीटर्स यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. मागील डिसेंबरमध्येच नेटफ्लिक्सने २०२३ मध्ये पासवर्ड शेअरींग टप्प्याटप्प्याने बंद करणार असल्याची मोठी घोषणा केली होती. युजर्स वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरींगसाठी पैसे घेण्याचा निर्णय घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फोटो, Video शेअर करताना मोबाईल स्लो होतोय? तर मग ‘ही’ ट्रिक नक्की वापरुन पाहा

अशातच आता ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत, नेटफ्लिक्सचे दोन नवीन सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टेड सारंडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी पासवर्ड शेअरिंगची सुविधा बंद करणार असल्याचं सांगितलं आहे. पीटर्स यांनी सांगितलं की, कंपनी पासवर्ड शेअरिंगवर नियंत्रण ठेवत असली तरीही ग्राहकांसाठी एक “ग्रॅज्युएटेड दृष्टिकोन” असेल. शिवाय जे लोक नेटफ्लिक्ससाठी पैसे देत नाहीत त्यांना आता पैसे द्यावे लागतील. यावेळी त्यांनी हे देखील मान्य केलं आहे की, हा निर्णय अनेकांना आवडणार नाही, त्यामुळे आमच्या स्ट्रीमिंग सेवेला काही नाखूष ग्राहकांनाही सामोरं जावं लागेल.

हेही वाचा- ChatGpt वापरणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे; जाणून घ्या

आपल्या ग्राहकांच्या वाढीत १५ ते २० मिलियनपर्यंत वाढ करायची असून यासाठी आम्हाला भारतासारख्या देशांवर विशेष लक्ष केंद्रित करावं लागणार असल्याचंही सीईओंनी सांगितलं. शिवाय हे लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गात पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करणं हा अडथळा येणार असून, पासवर्ड शेअरिंग बंद करुण नेटफ्लिक्सची प्रगती करणं हे आमच्यासाठी एक आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- Netflix कडून ३ कोटीच्या पॅकेजची मोठी जॉब ऑफर; तुम्हीही करु शकता अर्ज, पाहा काय आहे काम?

पासवर्ड शेअर करणार्‍या १०० मिलियन लोकांपैकी किती लोक त्यांच्या Netflix खात्यांसाठी पैसे भरण्यास सुरुवात करतील? असे विचारले असता, पीटर्स म्हणाले की, ग्राहकांना दर आठवड्याला “ग्लास ओनियन” सारखा कंटेट वितरित केल्यास ग्राहक पैसे देण्यास तयार होतील, त्यांची मन जिंकता येतील.’ पासवर्ड शेअरिंगनंतर नेटफ्लिक्ससाठी जाहिरातीवर फोकस केला असून यासाठी कंपनीने मागील वर्षी 6.99 डॉलर प्रति महिना सुरू होणारी जाहिरात-आधारित योजना आणली होती, जी सध्या मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड स्टेट्स येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflixs new ceo confirm password sharing will end vast majority will have to pay jap
First published on: 23-01-2023 at 14:37 IST