क्रिप्टोकरन्सी नंतर NFT अधिकच चर्चेत आहे. भारतात देखील एनएफटीला घेऊन अनेक मतभेद सुरु आहेत. काहीजण याला भविष्य मानत आहेत तर काहींच्या मते हा एक फुगा आहे जो लवकरच फुटेल. सलमान खानसह इतर अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी एनएफटी आणण्याची घोषणा केली आहे. यातच फेसबुक, म्हणजेच आताची मेटा कंपनी त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या अ‍ॅप्समध्ये एनएफटी हे नवीन फीचर समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. फायनान्शिअल टाइम्स (Financial Times)च्या रिपोर्ट्सनुसार, मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एनएफटी विकण्यासंबंधी फीचर समाविष्ट करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनएफटी मार्केट प्लेस तयार करण्यात येत आहे

रिपोर्टनुसार, फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये वापरकर्ते आपल्या प्रोफाइल फोटोमध्ये एनएफटी दाखवू शकतील असे फीचर जोडले जाईल. सोबतच फेसबुकवर एनएफटी बनवण्याचे फीचरसुद्धा दिले जाऊ शकते. एवढेच नाही तर एनएफटी मार्केट प्लेसही तयार करण्यात येत आहे, ज्याच्या मदतीने एनएफटीची खरेदी-विक्री करता येईल.

लोकप्रिय गेम ‘Candy Crush’वर आता ‘या’ कंपनीची मालकी; गेमिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील

नुकतंच इंस्टाग्रामच्या हेडने सांगितलं की कंपनी एनएफटीबाबत अजून माहिती जाणून घेत आहे. तसेच ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचवता येईल याचाही अभ्यास केला जात आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये जर एनएफटी फीचर समाविष्ट केले गेले, तर वापरकर्त्यांसाठी देखील ते अधिक फायदेशीर ठरू शकेल. कारण फेसबुक आणि इंस्टाग्रामची पोहोच अधिक आहे आणि अशा परिस्थितीत अधिकाधिक लोक त्यांच्या गोष्टी एनएफटी करून पैसे कमावू शकतील. मात्र, हे फीचर कधी येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

WhatsApp घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स; फोटो आणि व्हिडीओ एडिट करणं होणार सोपं

एनएफटी काय आहे ?

एनएफटी म्हणजे नॉन फंजिबल टोकन. हे तुमच्या वस्तूला तुमची ओळख देते. जेणेकरून, तुमच्या वस्तूवर इतर कोणीही दावा करू शकत नाही. एनएफटी हे ब्लॉकचेनवर आधारित आहे. हे ब्लॉकचेन एक तंत्रज्ञान आहे आणि क्रिप्टोकरन्सीही त्यावरच आधारित आहे. हे सुरक्षित मानले जाते आणि कोणत्याही प्रणालीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New features on facebook and instagram nft for buying and selling pvp
First published on: 21-01-2022 at 11:36 IST