scorecardresearch

नव्या स्मार्टफोनमध्ये का नसतो रिमुव्हेबल बॅटरीचा पर्याय? जाणून घ्या या मागचं कारण

काढता न येणारी बॅटरी लावण्यामागचं एक कारण म्हणजे हे ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे. यामुळे बॅटरीचा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका संपतो.

removable battery janasatta file photo
रिमुव्हेबल बॅटरीमध्ये इलेक्ट्रोडची मात्र अधिक असल्याने बॅटरीचे तापमान वाढते आणि शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. (File Photo : Janstta)

हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये बॅटरी काढण्याचा पर्याय दिला जात नाही. हा ट्रेंड सर्वात आधी अ‍ॅपल कंपनीद्वारे सुरु करण्यात आला होता. यानंतर हळू-हळू सर्वच मोबाईल कंपन्यांनी ही पद्धत सुरु केली. परंतु असे का केले जात आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? जाणून घेऊया रिमुव्हेबल बॅटरीचा पर्याय का हटवण्यात आला आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होत आहे.

ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित बॅटरी

काढता न येणारी बॅटरी लावण्यामागचं एक कारण म्हणजे हे ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे. यामुळे सतत बॅटरी काढण्याची समस्या दूर झाली, तसेच बॅटरीचा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका संपला. शिवाय बॅटरी फुगण्याची समस्याही नष्ट झाली. रिमुव्हेबल बॅटरीमध्ये इलेक्ट्रोडची मात्र अधिक असल्याने यामध्ये अधिक एनर्जी जनरेट होते. इलेक्ट्रोडमुळे बॅटरीचे तापमान वाढते आणि शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, शास्त्रज्ञांनी नॉन रिमुव्हेबल बॅटरीची रचना केली आहे.

अपघात टाळण्यात अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम निभावते महत्त्वाची भूमिका; जाणून घ्या कसे करते काम

दीर्घकाळ टिकते नॉन रिमुव्हेबल बॅटरी

नॉन रिमुव्हेबल बॅटरी एकाच चार्जवर दीर्घकाळ टिकते. ही बॅटरी जास्तीत जास्त लोडसह चालते. यामध्ये लिथियम-आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ टिकते. यामुळे ग्राहकांना फोन जास्त वेळ चालवता येत असून बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागत नाही.

नव्या स्मार्टफोन्सला मिळतो स्मार्ट लूक

आजकाल अधिक महागडे आणि उत्तम डिझाइन्स असलेले स्मार्टफोन बाजारात येत आहेत. या कारणास्तव, ग्राहकांनाही अशी अपेक्षा असते की मोबाईल कंपनी त्यांना शक्तिशाली बॅटरीसह उत्तम डिझाईन असलेला पर्याय देईल. यामुळे ग्राहकांना स्लिम आणि आकर्षक लूकच्या बाबतीत चांगला स्मार्टफोन मिळतो.

सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

बॅटरी काढता न येणारे स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. तथापि, याबाबत ग्राहकांना काही तक्रारी देखील आहेत, कारण हे स्मार्टफोन स्वॅपिंग बॅटरीच्या बजेटमध्ये येत नाहीत. त्याचबरोबर बॅटरी वेगळी चार्ज करून वापरता येत नाही. याशिवाय, यामध्ये उत्तम फीचर आणि आयपी रेटिंग्सही दिले जात नाहीत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New smartphone doesnt have a removable battery option know the reason pvp

ताज्या बातम्या