Nine Year Girl Devolope Storytelling App | Loksatta

वयाच्या नवव्या वर्षी ‘ति’चे कर्तृत्व; ॲपलचे सीईओ झाले इंप्रेस, लहान वयात चिमुकली करत ‘हे’ आहे कार्य…

ॲपलचे सीईओ टिम कुक, टेक जगतातील एक मोठे नाव, मात्र याच टीम कुक यांना एका नऊ वर्षाच्या चिमुरडीची दखल घ्यावी लागली आहे. असं नेमकं काय झालं ज्यानं जगातल्या टेक क्षेत्रातल्या एका दिग्गजाला एका साधारण मुलीची दखल घ्यावी लागली…चला नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया.

वयाच्या नवव्या वर्षी ‘ति’चे कर्तृत्व; ॲपलचे सीईओ झाले इंप्रेस, लहान वयात चिमुकली करत ‘हे’ आहे कार्य…
Photo-indianexpress

ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी एका नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचे कौतुक केले आहे. ही मुलगी अगदी लहान वयात iOS ॲप डेव्हलपर म्हणून काम करत आहे आणि तिने पाठवलेल्या ईमेलला प्रतिसाद देत कुकने तिचे सर्वात तरुण ॲप डेव्हलपर म्हणून अभिनंदन केले.

दुबईत राहणाऱ्या या भारतीय वंशाच्या तरुणीचे नाव हाना मोहम्मद रफिक आहे. हानाने टीम कूकला त्याच्या स्टोरीटेलिंगॲप हनासबद्दल सांगणारा ईमेल पाठवला, जो हानानं स्वतः विकसित केला आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, हानस हे एक मोफत iOS ॲप आहे ज्याच्‍या मदतीने पालक त्यांच्या मुलांसाठी कथा रेकॉर्ड करू शकतात.

वयाच्या फक्त आठव्या वर्षी डिझाईन केलेले

हानाने सांगितले की, तिने हानस ॲप फक्त आठ वर्षांची असताना तयार केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे ॲप बनवण्यासाठी सुमारे १० हजार ओळींचा कोड लिहावा लागला. हाना म्हणाली की ती पाच वर्षांची असल्यापासून कोडिंग करत आहे आणि ॲप तयार करण्यासाठी प्री-मेड थर्ड-पार्टी लायब्रेरीज, क्लासेज किंवा कोड्सची मदत घेतली नाहीय.

आणखी वाचा : एसबीआय कार्डच्या वतीने फेस्टीव्ह ऑफर २०२२ ची घोषणा; खरेदीवर मिळणार ‘इतका’ कॅशबॅक

कुकने ईमेलला उत्तर देताना हानाचे केले अभिनंदन

ईमेलमध्ये, हानाने ॲपलच्या सीईओला तिच्या ॲपचे प्रीव्ह्यू करण्यास सांगितले. या ईमेलला उत्तर देताना, टिम कुकने एवढ्या लहान वयात ॲप तयार करून ही कामगिरी केल्याबद्दल हानाचे अभिनंदन केले. हानाचं काम असंच सुरू राहीलं तर भविष्यात ती आणखी चांगले काम करू शकेल, असे त्यांनी सांगितले.

हाना तिच्या बहिणीसोबत कोडिंग करत आहे

हाना आणि तिची बहीण लीना या दोघींनीही त्यांच्या पालकांच्या मदतीने स्वतः कोडिंग शिकले आहे. हानाच्या बहिणीने एक वेबसाइट तयार केली आहे ज्याच्या मदतीने मुलांना शिकवले जाऊ शकते. भारतीय वंशाच्या हानाला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे आणि त्यानंतर ती ॲपलमध्ये जाण्याचा विचार करत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अखेर Jio Phone 5G ची किंमत जाहीर! असा असेल जगातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल; जाणून घ्या किंमत

संबंधित बातम्या

घरी बसून रेल्वे तिकीट कॅन्सल करू शकता, पैसे परत मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
अनोख्या फीचरसाठी प्रायव्हसी धोक्यात घालू नका, व्हॉट्सअ‍ॅपचा ‘हा’ क्लोन अ‍ॅप आत्ताच अनइन्स्टॉल करा, असा करतोय हेरगिरी
नोकिया T10 LTE आवृत्ती भारतात लॉन्च; किंमत फक्त…
चिंताजनक: 9-10 वर्षांची मुलं अडकतायत सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात, कारण माहितेय का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी