मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामची गरज नाही; व्हॉटसअ‍ॅपवरून करता येणार शेअर | No need to download Telegram now you can send 2 gb movies through whatsapp know how | Loksatta

मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामची गरज नाही; व्हॉटसअ‍ॅपवरून करता येणार शेअर

मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामअ‍ॅप वापरले जाते. पण आता हे व्हॉटसअ‍ॅपवरून शक्य आहे, कसे ते जाणून घ्या.

मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामची गरज नाही; व्हॉटसअ‍ॅपवरून करता येणार शेअर
(Photo : Indian Express)

स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या अनेक अ‍ॅप्समुळे कोणाशीही संवाद साधणे खूप सोप्पे झाले आहे. संवाद साधण्याबरोबर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपल्याला आवडलेल्या व्हिडीओची, गाण्यांची लिंक देखील शेअर करतो. तर कधीकधी आपल्याला मोठ्या फाइल्स किंवा एखादा चित्रपट शेअर करायचा असेल तेव्हा टेलिग्राम अ‍ॅपची मदत घेतली जाते. टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण अनेक जणांकडे हे अ‍ॅप नसते. अशावेळी तुम्ही व्हॉटसअ‍ॅपची मदत घेऊ शकता. व्हॉटसअ‍ॅपवरून मोठ्या फाइल्स कशा शेअर करता येतील जाणून घ्या.

काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरून २ जीबी पर्यंतची फाइल देखील शेअर करू शकता. सुरक्षेच्या दृष्टीने टेलिग्रामपेक्षा व्हॉटसअ‍ॅप जास्त सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरून मोठ्या फाइल्स शेअर करण्याचा पार्याय निवडू शकता.

आणखी वाचा : फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

व्हॉटसअ‍ॅपवरून मोठ्या फाइल्स शेअर करायच्या असतील तर सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवरून व्हॉटसअ‍ॅप बीटा वर्जन डाउनलोड करा. बीटा वर्जनमध्ये सामान्य वर्जनपेक्षा एक्स्ट्रा फीचर उपलब्ध आहेत. बीटा वर्जनमधून २ जीबीपर्यंतची फाइल पाठवणे शक्य आहे.

मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • सर्वात आधी बीटा व्हॉटसअ‍ॅप उघडा. त्यातील अटॅचमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये व्हॉटसअ‍ॅप कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन, डॉक्युमेंट आणि फोटो हे ६ पर्याय दिसतील.
  • या पर्यायांमधून डॉक्युमेंट (व्हॉटसअ‍ॅप) वर क्लिक करा.
  • यानंतर फाइल मॅनेजरमधून कोणती फाइल किंवा चित्रपट पाठवायचा आहे तो निवडा. तुम्हाला ज्या क्रमांकावर ही फाइल पाठवायची आहे त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ती फाइल किंवा चित्रपट एमकेवी (MKV) फॉरमॅटमध्ये पाठवला जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
GPay Payment : गूगलच्या प्रत्येक पेमेंटमधून जास्त कॅशबॅक मिळवण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक

संबंधित बातम्या

Best Recharge Plan: मस्तच! ३९५ रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घ्या; तीन महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध
विश्लेषण: एलॉन मस्कच्या ट्विटरला नाकारत ब्राझीलच्या नागरिकांचं भारतीय Koo App ला प्राधान्य; दोघांमध्ये नेमका फरक काय?
Smartphone Offer: मस्तच! अवघ्या ९९९ रुपयात मिळतोय 5G स्मार्टफोन; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर
Vodafone Idea 5G Launch: जाणून घ्या Vi 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील
आता घरबसल्या मिळणार Jio 5G सिम! ऑर्डर करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यशासन ऊसदर प्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देईल; शेतकरी संघटनांची अपेक्षा
‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र