भारतात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी खाती असतात. जी खूप महत्वाची असतात. या सर्व खात्यांची नावे आणि पासवर्ड लक्षात ठेवणे देखील कठीण असते. त्याचप्रमाणे पासवर्ड विसरल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पासवर्ड विसरल्यास तो पासवर्ड पुन्हा रिसेट करण्यात बराच वेळ वाया जातो. तर आज आम्ही तुम्हाला अशा सोप्या ट्रिक बद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याची किंवा लिहून ठेवायची गरज नाही. तर जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पासवर्ड व्यवस्थापक

गूगलच्या या पासवर्ड फीचरचे नाव पासवर्ड व्यवस्थापक आहे. तुम्हाला हे गुगल क्रोम मध्ये मिळून जाईल. यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याची किंवा लिहून ठेवायची गरज नाही. तुम्हाला फक्त गुगल खात्याचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज आहे. ज्यासह गुगल क्रोम सुद्धा sync होईल.

( हे ही वाचा: Jio AirFiber: आता वायरशिवाय रॉकेट स्पीडवर मिळेल 5G Internet; जाणून घ्या कसे करेल काम)

  • हे वैशिष्ट्य संगणक आणि मोबईल दोन्हीसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही मोबईल किंवा संगणकावर क्रोम उघडा आणि वरच्या उजव्या बाजूला क्लोज ऑप्शनखाली दाखवलेल्या तीन डॉटवर जा.
  • तीन डॉटसवर क्लिकवर केल्यावर तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. आणि ऑटो क्लिकवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला पासवर्ड क्लिक करावा लागेल. येथे तुम्हाला ऑफर टू सेव्ह पासवर्डचा पर्याय दिसेल, जो तुम्हाला सक्षम करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचे खाते उघडाल तेव्हा तुमचे युजरनेम, पासवर्ड टाकताना क्रोम तुम्हाला ते सेव्ह करण्यास सांगेल. तुम्हाला सेव्हचा पर्याय निवडावा लागेल आणि तुमचे खाते, नाव , आणि पासवर्ड सेव्ह होईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No need to remember any password know about google chrome feature know tips and tricks gps
First published on: 30-08-2022 at 17:32 IST