Noise कंपनीची स्मार्टवॉच हल्ली लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टवॉच लाँच करत असते. तर आतासुद्धा नॉईजने आपल्या ग्राहकांसाठी कोणते स्मार्टवॉच लाँच केले आहे ते पाहुयात.

Noise कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी याआधी i1स्मार्टग्लास सुद्धा लाँच केली होती. आता या कंपनीने दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. ColorFit Pro 4 आणि ColorFit Pro 4 Max ही दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. हे एक अफोर्डेबल स्मार्टवॉच असून,कलर फिट प्रो मॅक्स ४ कंपनीचे फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे.

Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

हेही वाचा : मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १२०० रुपयांत; जाणून घ्या

काय आहेत फीचर्स ?

Noise ColorFit Pro 4 Maxमध्ये अलार्म लावणे, व्हॉइस असिस्टंटला सूचना देऊन कोणत्याही फ़ंक्शन ओपन करणे असे फीचर्स आहेत. हे स्मार्टवॉच अ‍ॅपल सिरी, अ‍ॅमेझोन अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटला सपोर्ट करते. हे स्मार्टवॉच आयफोन(iPhone) व अँड्रॉइडवर देखील काम करू शकते. यात १.८० इंचाचा टीएफटी एलसीडी स्क्रीन देण्यात आला आहे. २४०×२५८ इतके रिझोल्युशन आहे. तसेच कंपनीने याचे अफोर्डेबल व्हेरिएंट देखील लाँच केले आहे. यात १.७२ इंचाचा टीएफटी एलसीडी स्क्रीन असून त्याचे रिझोल्युशन हे ३५६×४०० इतके आहे. या दोन्ही स्मार्टवॉच एकदा चार्ज केला ७ दिवस याची बॅटरी चालू शकते असे दावा कंपनीने केला आहे.

या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट्स, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर आणि स्लिप व स्ट्रेस मॉनिटर हे फीचर्स असणार आहेत. तसेच यात फिटनेस संबंधित आणि खेळासंबंधित सुद्धा फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या

किती असणार किंमत ?

Noise कंपनीने लाँच केलेल्या कलर फिट प्रो ४(ColorFit Pro 4) या स्मार्टवॉचची किंमत ३,४९९ रुपये इतकी असणार आहे. तर कलर फिट प्रो ४ मॅक्स या स्मार्टवॉचची किंमत ३,९९९ रुपये इतकी असणार आहे.