Nokia ही मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील फार प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने MWC २०२३ मध्ये आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. HMD global ने भारताने आपली नवीन सिरीजमधील बजेटमधील नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Nokia C12 स्मार्टफोन अँड्रॉइड १२ गो एडिशन हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत, फिचर आणि स्पेरीफिकेशनबद्दल जाणून घेऊयात. हा फोन कंपनीने अत्यंत कमी किंमतीमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

Nokia C12 चे फिचर्स

Nokia C12 मध्ये ६.३ इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले आहे. तसेच स्क्रीनसाठी ६०Hz इतका रिफ्रेश रेट मिळतो. नोकियाचा हा फोन बनवण्यासाठी प्लास्टिक फ्रेम आणि बॅक पॅनलचा वापर करण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये अतिरिक्त सेफ्टी देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच हा फोन एका वर्षाच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह येतो.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

Nokia C12 मध्ये Octa-core Unisoc 9863A1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच २ जीबी रॅम देखील यात वाढवता येते. नोकियाचा हा फोन वायर्ड आणि वायरलेस एफएम रेडिओला सपोर्ट करतो.

हेही वाचा : Tech Layoff: आर्थिक मंदीचा मोठा फटका! ‘या’ दिग्गज टेक कंपनीमध्ये पुन्हा एकदा ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची होणार कपात

Nokia C12 या स्मार्टफोनमध्ये ८मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन पोर्ट्रेट मोड आणि नाईट मोडला सपोर्ट करतो. वापरकर्त्यांच्या सेफ्टीसाठी यामध्ये फेस अँलोकचे फिचर देखील देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने फोनमधील अ‍ॅप्स ३० टक्के वेगाने ओपन होतील. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी ५W चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने Nokia C12 ला दोन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे मेनी केले आहे.

काय असणार किंमत ?

Nokia C12 हा स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत ५,९९९ रुपये इतकी आहे. १७ मार्चपासून देशभरात या फोनची विक्री सुरु होणार आहे. हा फोन तुम्ही Amazon India वरून खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Dark Blue, Charcoal आणि Light Mint या रंगांमध्ये खरेदी करू शकता.