scorecardresearch

‘हे’ पासवर्ड ऑनलाइन खात्यांसाठी धोकादायक, यादीत तुमचे पासवर्ड तर नाही ना? वाचा..

पासवर्डबाबात नॉर्डपासच्या संशोधनातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मोठ्या संख्येने लोक १२३४५, QWERTY आणि PASSWORD सारखे पासवर्ड वापरत असल्याचे समोर आले आहे.

‘हे’ पासवर्ड ऑनलाइन खात्यांसाठी धोकादायक, यादीत तुमचे पासवर्ड तर नाही ना? वाचा..
प्रतिकात्मक छायाचित्र (Photo : Pixabay)

ऑनलाइन फसवणूक आणि डेटा चोरीचे प्रकार अधिक वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि इतर संकेतस्थांवरील तुमचे खाते हॅक होऊ नये यासाठी चांगला पासवर्ड देणे गरजेचे आहे. मात्र, लोक आठवणीत राहावे यासाठी सोपा पासवर्ड देतात. परिणामी तो हॅक होण्याची शक्यता अधिक असते.

पासवर्डबाबत नॉर्डपासच्या संशोधनातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मोठ्या संख्येने लोक १२३४५, QWERTY आणि PASSWORD सारखे कमकुवत पासवर्ड वापरत असल्याचे समोर आले आहे. असे पासवर्ड फार लवकर क्रॅक होतात. डेटा सुरक्षेसाठी अशा प्रकारचे पासवर्ड टाळले पाहिजे. पुढे काही कमकुवत पासर्वड देण्यात आले आहेत, जे तुम्ही टाळले पाहिजे.

(कर्ज, थकबाकीच्या गर्तेत अडकली व्हीआई कंपनी, उभारीसाठी सीईओची सरकारडे ‘ही’ मागणी)

 • १२३४५६
 • १२३४५६७८९
 • १२३४५
 • QWERTY
 • password
 • १२३४५६७८
 • ११११११
 • १२३१२३
 • १२३४५६७८९०
 • १२३४५६७

केवळ हेच नव्हे, तर लोक पासवर्ड म्हणून कोडबरोबर आपला नावाचा देखील वापर करत असल्याचे नॉर्डपासच्या संशोधनातून समोर आले आहे. अनेक देशांमध्ये डॉल्फिन हा शब्द जनावरांशी संबंधित पासर्वडमध्ये नंबर एकवर आहे.

(लावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर)

अनोखे आणि सुरक्षित पासवर्ड बनवण्यासाठी हे करा

 • पासवर्डमध्ये कमीत कमी १२ कॅरेक्टर ठेवा.
 • मोठा पासवर्ड माहिती करण्यास वेळ लागतो. याने हॅकर्सला पासवर्ड मिळवण्यापासून थांबवता येऊ शकते.
 • पासवर्ड हे अपर आणि लोअर केस अक्षरे, संख्या तसेच चिन्हांमध्य असावे.
 • विविध खात्यांचे पासवर्ड एकसारखे नसावे.
 • दर ९० दिवसांनी आपला पासवर्ड बदलत राहा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 16:28 IST

संबंधित बातम्या